पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ३७ माहा. असद्वत्त पुरुषाच्या (अन्याय ) कर्माचे फल ताबडतोब मिळत नसते. धान्य पिकण्यास जसा विलंब लागतो, त्याप्रमाणे अन्यायकर्माचे फळ मिळण्यास काल सहाय होतो-विलंब लागतो. २१५. न ते मनुष्या देवास्ते ये चारु शुभकुण्डलम् । मुखं द्रक्ष्यन्ति रामस्य वर्षे पञ्चदशे पुनः॥२।६४।६८ रामचंद्राचे सुंदर कुंडलमंडित मनोहर मुख पंधरा वर्षांनी जे पुनः पाहातील, ते मनुष्य नव्हेत, तर साक्षात् देव होत. २१६. न त्वां पश्यामि कौसल्ये साधु मां पाणिना स्पृश । रामं मेऽनुगता दृष्टिरद्यापि न निवर्तते ॥ २॥४२॥३४ हे कौसल्ये ! तूं मला दिसत नाहीस. तूं मला आपल्या हस्ताने स्पर्श कर बरें! माझी दृष्टि रामाच्या बरोबर गेली आहे, ती त्यापासून निवृत्त होत नाही. २१७. न त्वेवानागते काले देहाच्च्यवति जीवितम्।।२।३९।५ काल प्राप्त झाल्याशिवाय देहापासून जीवित नष्ट होत नाही. २१८. न दूतवध्यां प्रवदन्ति सन्तो।। दूतस्य दृष्टा बहवो हि दण्डाः ॥ ५।५२।१४ दूताचा वध करणे, ह्या गोष्टीचा सजनांनी निबंध केला आहे. दूताला इतर दंड सांगितले आहेत. २१९. न देशकालौ हि यथार्थधर्मा-- ववेक्षते कामरतिर्मनुष्यः ॥ ४।३३।५५ कामप्रेमी मनुष्य देशकाल जाणत नाही; त्याप्रमाणे अर्थ आणि धर्म यांनाही तो जाणत नाही. २२०. न नूनं चात्मनः श्रेयः पथ्यं वा समवेक्षसे । - मृत्युकाले यथा मयों विपरीतानि सेवते ॥ ३॥५३॥१७ मृत्युकाली मनुष्य अपथ्य वस्तूंचे सेवन करीत असतो, त्याप्रमाणे तूं आपलें कल्याण व हित कशांत आहे, हे जाणत नाहीस. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri