पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. mmmm २०९. न चिरं पापकर्माणः क्रूरा लोकजुगुप्सिताः। ऐश्वर्यं प्राप्य तिष्ठन्ति शीर्णमूला इव द्रुमाः॥३।२९।७ . ज्यांची मुळे छिन्न झाली आहेत, असे वृक्ष वांचत नाहीत; त्याप्रमाणे जे क्रूर असून पापकर्मे करणारे असतात, व तेणेकरून लोकनिंदेस पात्र झालेले असतात, त्यांस ऐश्वर्य प्राप्त झाले, तरी त्याचा ते चिरकाल उपभोग घेऊ शकत नाहीत. २१०. न चिरात्प्राप्यते लोके पापानां कर्मणां फलम् । सविषाणामिवान्नानां भुक्तानां क्षणदाचर ॥ ३।२९।९ हे राक्षसा ! विषभोजन करणाराला जसें त्याच्या कर्माचे तत्काल फल मिळतें, त्याप्रमाणे पापकर्माचे फल ( मनुष्याला ) फार विलंब न लागतां-त्वरित-मिळतें. २११. न तत्कुर्यादसिस्तीक्ष्णः सो वा व्याहतः पदा। अरिवो नित्यसंक्रुद्धो यथात्मा दुरनुष्ठितः।।७५९ प्र.२।२५ दुर्विनति आत्म्याकडून स्वतःच्या दुराचारामुळे-जें नुकसान होते, तें तीक्ष्ण खड्ग करीत नाही, पायाने तुडविलेला सर्प करत नाही, किंवा नित्य क्रुद्ध असा शत्रुही करू शकत नाही. २१२. न तत्समाचरेद्धीरो यत्परोऽस्य विगर्हयेत् । यथात्मनस्तथान्येषां दारा रक्ष्या विमर्शनात् ॥३॥५०८ ज्या कर्माबद्दल दुसरे लोक निंदा करितील, तें कर्म शहाण्या मनुष्याने आचरूं नये. स्वस्त्रीप्रमाणे परस्त्रियांचेही परस्पर्शापासून रक्षण करावें. २१३. न तं पश्याम्यहं लोके परोक्षमपि यो नरः। ___स्वमित्रोऽपि निरस्तोऽपि योऽस्य दोषमुदाहरेत्।।२।२१५ या लोकामध्ये कोणी मनुष्य, मग तो अत्यंत शत्रु असो, अगर ( काही पातकामुळे ) हद्दपार केलेला असो, ह्या (रामचंद्राचे) परोक्षही दोष कथन करील, असा मला दिसत नाही. २१४. न तु सद्योऽविनीतस्य दृश्यते कर्मणः फलम् । कालोऽप्यङ्गीभवत्यत्र सस्यानामिव पक्तये ॥३॥४९।२७ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri