पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २०३. न खल्वथैव सौमित्रे जीवितं जाह्नवजिले । त्यजेयं राजवंशस्तु भर्तुर्मे परिहास्यते ।। ७।४८१८ हे लक्ष्मणा ! जान्हवीच्या-गंगेच्या-जलांत मी आज प्राणत्याग करीत नाही. | तसे केल्यास (मी गर्भवती असल्याकारणाने ) पतीचा राजवंश नष्ट होईल. २०४. नखैस्तुदन्तो दशनैर्दशन्त स्तलैश्च पादैश्च समापयन्तः। मदात्कपिं ते कपयः समन्ता न्महावनं निर्विषयं च चक्रुः ॥ ५।६१।२४ ( दधिमुख ) वानराला त्या मदोन्मत्त वानरांनी नखांनी टोचून, दांतांनी दंश करून व तळहातांच्या आणि पायांच्या प्रहारांनी मृतप्राय करून ते विशाल वन चारी बाजूंनी निर्विषय-मद्यरहित केले. २०५. न च कर्मसु सीदन्ति महत्स्वमिततेजसः॥५।६८।१९ महातेजस्वी लोक मोठ्या कामांत कधीही श्रम पावत नाहीत. २०६. न च पश्यामि सदृशं पृथिव्यां तव किंचन । सदृशं यत्प्रियाख्याने तव दत्त्वा भवेत्सुखम् ॥६।११३।१९ -- (हे मारुते ! ) तूं जी प्रियवार्ता कथन केलीस, त्याबद्दल योग्य देणगी तुला देऊन सुख पावेन, अशी एकही वस्तु पृथ्वीवर मला दिसत नाही. २०७. न च सीता त्वया हीना न चाहमपि राघव । मुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्भुतौ॥२॥५३॥३१ हे राघवा ! तुजविरहित सीता, आणि मीही, जलांतून काढलेल्या माशाप्रमाणे मुहूर्तभर-थोडा वेळही-जगणार नाही. २०८. न चातिप्रणयः कार्यः कर्तव्योप्रणयश्च ते । उभयं हि महादोषं तस्मादन्तरदृग्भव ॥ ४॥२२॥२३ तूं ( त्यावर ) अत्यंत प्रेमही करूं नये, किंवा अप्रेमही दाखवू नये. ह्या दोनही गोष्टी महादोषावह आहेत. म्हणून तूं मध्यम स्थितीनें रहा. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri