पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. १९७. धुरमेकाकिना न्यस्तां वृषभेण बलीयसा। किशोरवद्गुरुं भारं न वोढुमहमुत्सहे ॥६।१२८।३ ज्याप्रमाणे एकाद्या बलिष्ठ बैलाने आपल्या खांद्यावरील जोखडाचा मोठा भार ( जवळील ) कोवळ्या गोह्यावर लादला असतां तो त्या वत्साच्याने वाहवत नाही, तसा मी हा मोठा राज्यभार वाहण्यास उत्साह पावत नाही. १९८. धृतिप्रवालः प्रसभाग्यपुष्प ___स्तपोबलः शौर्यनिबद्धमूलः । रणे महानाक्षसराजवृक्षः संमर्दितो राघवमारुतेन ॥ ६।१०९।१० ज्याचा अंकुर म्हणजे धैर्य, हठ हे ज्याचे श्रेष्ठ पुष्प, तप हे ज्याचें बल, शौर्यही ज्याचे बळकट मूळ असा हा मोठा राक्षसराजरूप वृक्ष रणक्षेत्रावर रामरूप वायूने मोडून टाकिला आहे. १९९. न कश्चिन्नापराध्यति ॥४॥३६।११ ज्याच्यापासून अपराध घडत नाही, असा कोणी नाही. २००. न कालस्यास्ति बन्धुत्वं न हेतुने पराक्रमः । न मित्रज्ञातिसम्बन्धः कारणं नात्मनो वशः ॥ ४॥२५१७ कालाला बंधुत्व नाहीं; त्याला कोणत्याही कारणाची गरज लागत नाही. त्याला फिरविण्यास पराक्रम समर्थ होत नाही; मित्र व ज्ञातिजन यांचा संबंधही त्याला लागत नाही; तो कोणाच्या इच्छाधीन राहात नाही.. २०१. न कालादुत्तरं किंचित्परं कर्म उपासितुम् ॥ ४।२५।३ ___ कालाचे अतिक्रमण झाले असतां कोणतेही विहित कर्म करणे अशक्य होय. २०२. न कुलेन न रूपेण न दाक्षिण्येन मैथिली । मयाधिका वा तुल्या वा तत्तु मोहान बुध्यसे॥६।११।२८ - ही मैथिली-सीता-कुलीनपणांत, रूपांत, अगर दक्षतेंत माझ्यापेक्षा अधिक नाही, किंवा मजशी तुल्यही नाही. तूं मात्र मोहाने हे जाणत नाहीस. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri