पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. |१९०. धर्मो हि परमो लोके धर्मे सत्यं प्रतिष्ठितम् ॥२।२११४१ ___ लोकांमध्ये धर्म हा अत्यंत श्रेष्ठ आहे, आणि धर्माच्याच ठिकाणी सत्य | प्रतिष्ठित आहे. १९१. धर्मो हि श्रूयते पक्ष अमराणां महात्मनाम् । अधर्मो रक्षसां पक्षो ह्यसुराणां च राक्षस ॥६॥३५।१४ हे राक्षसा ! धर्म हा महात्म्या देवांचा पक्ष आहे, आणि अधर्म हा राक्षस आणि असुर यांचा पक्ष आहे, असे सांगितले आहे. १९२. धर्षितं मर्षणीयं च चेष्टितं कृतकर्मणाम् ॥ ५।६३।३० हे वानर कृतकार्य असल्यामुळे, त्यांची दांडगाई आणि त्यांच्या चेष्टा क्षम्य आहेत. १९३. धारणाद्धर्ममित्याहुधर्मेण विधृताः प्रजाः। यस्माद्धारयते सर्वं त्रैलोक्यं सचराचरम्।।७।५९/प्र.२।७ धारणामुळे 'धर्म' असें नांव प्राप्त झाले आहे. प्रजा धर्मानें धारण केल्या जातात, याच कारणास्तव सर्व चराचरात्मक त्रैलोक्याचे धारण धर्म करीत असतो. १९४. धारणाद्विद्विषां चैव धर्मेणारञ्जयन्प्रजाः । तस्माद्धारणमित्युक्तं स धर्म इति निश्चयः।७५९प्र.२।८ शत्रूचें-अधर्माचे नियमन करून व न्यायाला अनुसरून धर्म प्रजांचे अनुरंजन करीत असतो. असा जो धर्म त्यासच 'धारण' असें निश्चित म्हटले आहे. १९५. धिगस्तु परवश्यताम् ॥ ५।२५।२० परवशतेचा धिक्कार असो. १९६. धिगस्तु योषितो नाम शठाः स्वार्थपरायणाः । न ब्रवीमि स्त्रियः सर्वा भरतस्यैव मातरम्॥२।१२।१०० ज्या स्वार्थपरायण लबाड स्त्रिया आहेत, त्यांना धिक्कार असो. सर्व स्त्रियांविषयी मी बोलत नाही. भरताच्या मातेला मात्र माझं बोलणें लागू आहे. ३ रा. सु. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri