पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. . . . . . . . . . . . . . . . . १८४. धन्याः खलु महात्मानो ये बुद्धया कोपमुत्थितम् । निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमाग्निमिवाम्भसा ॥५।५५।३ प्रदीप्त अग्नीला उदकानें निरुद्ध करावें, त्याप्रमाणे जे महात्मे उत्पन्न झालेल्या कोपाचें मनाने निवारण करितात, ते धन्य होत. १८५. धर्ममर्थं च कामं च काले यस्तु निषेवते । विभज्य सततं वीर स राजा हरिसत्तम ॥४॥३८।२१ जो धर्म, अर्थ आणि काम यांचे कालविभागाने त्या त्या काळी सेवन करितो, तोच हे कपिश्रेष्ठ वीरा ! राजा होय. . १८६. धर्मलोपो महांस्तावत्कृते ह्यप्रतिकुर्वतः। अर्थलोपश्च मित्रस्य नाशे गुणवतो महान् ॥४।३३।४७ उपकाराबद्दल प्रत्युपकार न करणाऱ्याच्या हातून मोठा धर्मलोप होतो. त्यामुळे गुणवान् मित्राच्या मैत्रीचा नाश होऊन मोठा अर्थलोपही होतो. १८७. धर्मात्प्रच्युतशीलं हि पुरुषं पापनिश्चयम् । . त्यक्त्वा सुखमवानोति हस्तादाशीविषं यथा॥६।८७।२२ हातांतून सर्पास टाकिलें असतां जसें सुख होते, त्याचप्रमाणे धर्मभ्रष्ट पापमति पुरुषाचा त्याग केला असतां सुख होते. १८८. धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् । धर्मेण लभते सर्व धर्मसारमिदं जगत् ॥ ३।९।३० - धर्मापासून अर्थलाभ होतो, धर्मापासून सुख होते. धर्मापासून सर्व काही प्राप्ता होते. हे जग म्हणजे धर्माच्या आश्रयावर आहे. १८९. धर्मेण राष्ट्र विन्देत धर्मेणैवानुपालयेत् । धर्माच्छरण्यतां याति राजा सर्वेभयापहः॥ ॥७॥ ५९ प्र. २।१५ 1. सर्वभयविनाशक राजाला धर्माने राष्ट्रप्राप्ति होत्ये. त्याने धर्मानें (प्रजा )पालन करावें. धर्माचे योगानेंच रक्षणकर्तृत्व प्राप्त होते. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri