पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. असंस्कृत अग्नीचे ठिकाणी जशी हविर्द्रव्ये दूषित होतात, त्याप्रमाणे देशकालरहित, विपरीत केलेली कर्मे दूषित होतात. १७९. देशे देशे कलत्राणि देशे देशे च बान्धवाः । तं तु देशं न पश्यामि यत्र भ्राता सहोदरः॥६।१०१।१४ किंतु राज्येन दुर्धर्ष लक्ष्मणेन विना मम । 5 कथं वक्ष्याम्यहं त्वम्बां सुमित्रां पुत्रवत्सलाम् ॥ ६।१०१।१५ देशोदेशी बायका मिळतील, देशोदेशी बांधव मिळतील; परंतु सख्खा बंधु कोणत्याही देशांत ( कोठेही ) मिळेल, असे मला वाटत नाही. हे दुर्जया (सुषेणा)! आतां मला लक्ष्मणावांचून राज्य तरी घेऊन काय करावयाचे आहे? पुत्रवत्सल सुमित्रामातेला मी आतां काय बरें सांगावें ? १८०. दैवतं हि पतिः स्त्रियाः ॥७९५।१० स्त्रीचे दैवत म्हणजे पति होय. १८१. दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम् । न दैवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति ॥ २।२३।१८ ____ जो पुरुष आपल्या पराक्रमाने दैवाचा निरास करण्यास समर्थ असतो, त्याचा दैवानें कार्यनाश झाला, तरी तो दुःखी होत नाही. १८२. द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् । एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः ॥६।३६।११ - मी द्विधा भग्न झालों, तरी चालेल; परंतु कोणापुढे असा लवणार नाही. हा माझ्या अंगचा दोष असेल. कारण, कोणालाही स्वभाव सोडणे शक्य नाही. १८३. धनत्यागः सुखत्यागो देशत्यागोऽपि वानघ । " वयस्यार्थे प्रवर्तन्ते स्नेहं दृष्ट्वा तथाविधम् ॥ ४।८९ - हे निष्पापा! तशा प्रकारचा स्नेह पाहून, त्या स्नेह्याकरितां द्रव्याचा, सुखाचा किंवा देशाचाही त्याग केला जातो. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri