पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. . १७३. दुर्लभस्य च धर्मस्य जीवितस्य शुभस्य च । राजानो वानरश्रेष्ठ प्रदातारो न संशयः॥४।१८।४२ - हे वानरश्रेष्ठा ! दुर्लभ असा धर्म, आणि ऐहिक अभ्युदयकारक जीवित यांचे दाते राजे हेोत, यांत संशय नाही. १७४. दुःशीलः कामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः। स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः॥२।११७।२४ वाईट आचरणाचा, कामवश झालेला, किंवा धनहीन असा जरी पति असला, तरी तो आर्यस्वभावाच्या स्त्रियांना परम दैवतच होय. १७५. दृश्यमाने भवेत्प्रीतिः सौहदं नास्त्यदृश्यतः । नाशयन्ति कृतनास्तु न रामो नाशयिष्यति॥५।२६।३९ चांगली वस्तु दृष्टीसमोर असली म्हणजे तिजसंबंधी प्रीति उत्पन्न होते. ती दृष्टीस -पडेनाशी झाली, म्हणजे तिजविषयी प्रेमबुद्धि राहात नाही. (हे सर्वत्र खरे नाही.) कृतघ्न असतात, तेच दूरगत सुहृदांना विसरतात, राम सुहृज्जनांना कधीही विसरत नाही. १७६. दृष्टपूर्वं न ते रूपं पादौ दृष्टौ तवानघे । कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ॥ ७४८।२२ हे निष्पापे ( सीते ) ! तुझे रूप मी पूर्वी पाहिलेले नाही. तुझे चरण केवळ मी पाहिलेले आहेत. ह्या वनांत राम विरहित तुला मी कशी बरे अवलोकन करूं ? १७७. दृष्टा देवीति हनुमद्वदनादमृतोपमम् । आकण्यं वचनं रामो हर्षमाप सलक्ष्मणः॥५।६४।४३ हनुमंताच्या तोंडून आपण देवी ( सीता ) पाहिली, असें अमृततुल्य वचन ऐकून लक्ष्मणाला व रामाला परम हर्ष झाला. १७८. देशकालविहीनानि कर्माणि विपरीतवत् । क्रियमाणानि दुष्यन्ति हवींष्यप्रयतेष्विव ॥ ६॥६३६६ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri