पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. १६६. दद्यान्न प्रतिगृह्णीयात्सत्यं ब्रूयान्न चानृतम् । 05 अपि जीवितहेतोहि रामः सत्यपराक्रमः॥ ५।३३।२५ ( राम ) दान करील, प्रतिग्रह करणार नाहीं; सत्यभाषण करील, असत्य बोलणार नाही. किंबहुना जीविताचाही त्याग करलि, परंतु सत्य सोडणार नाही.. १६७. दीनो वा राज्यहीनो वा यो मे भर्ता स मे गुरुः। 4 तं नित्यमनुरक्तास्मि यथा सूर्य सुवर्चला ॥ ५।२४।९. ____ माझा भर्ता, मग तो दीन असो, अगर राज्यहीन असो, तो मला पूज्य आहे. ज्याप्रमाणे सुवर्चला ओषधि सूर्याच्या ठिकाणी अनुरक्त असते, त्याप्रमाणे मी त्या ( रामा ) च्या ठिकाणी अनुरक्त आहे. १६८. दीप्तमग्निमरण्यं वा यदि रामः प्रवेक्ष्यति । प्रविष्टं तत्र मां देवि त्वं पूर्वमवधारय ॥२।२१।१७ . हे देवि ! प्रज्वलित अनीत, अथवा अरण्यांत जर राम प्रवेश करील, तर त्याच्या पूर्वी मीही तेथें प्रवेश करीन, हे पक्कें समज. १६९. दुःखितः सुखितो वापि सख्युर्नित्यं सखा गतिः४।८।४०. दुःखी असो, अगर सुखी असो, मित्राला मित्रच गति होय. १७०. दुःखे मे दुःखमकरोत्रणे क्षारमिवाददाः। राजानं प्रेतभावस्थं कृत्वा रामं च तापसम् ॥२।७३।३ राजाला ठार मारून व रामाला तपस्वी करवून, व्रणावर क्षाराचे सिंचन करावें,. त्याप्रमाणे तूं माझ्या दुःखावर दुःखाची डागणी दिली आहेस. १७१. दुबैलस्य त्वनाथस्य राजा भवति वै बलम् ॥ ७.५९ प्र.३।२२. दुर्बल व अनाथ यांचें बल म्हटलें म्हणजे राजा होय. १७२. दुर्लभं हि सदा सुखम् ॥ २।१८।१३ सदा सुख मिळणे म्हणजे दुर्लभ होय. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri