पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. गंधर्वांची कामवासना तीक्ष्ण असते, सर्षांचा कोप तीक्ष्ण असतो, मृगांचें भय तीक्ष्ण असते, त्याप्रमाणे आमची-पक्ष्यांची-क्षुधा तीक्ष्ण असते. १६१. तीक्ष्णमल्पप्रदातारं प्रमत्तं गर्वितं शठम् । ____व्यसने सर्वभूतानि नाभिधावन्ति पार्थिवम्॥३॥३३॥१५ जो ( आपल्या प्रधानादिकांशी ) कठोरपणाने वर्ततो, त्यांस वेतन वगैरे स्वल्प प्रमाणाने देतो, जो उन्मत्तपणे वागतो, गर्व धारण करितो, गुप्तपणे लोकांचें अहित करितो, अशा राजावर संकट आले असता, त्याच्या संरक्षणाकरितां कोणीही त्याचे स्वजनही-धावून येत नाहीत. १६२. त्वद्विधा न हि शोचन्ति सततं सर्वदर्शनाः । सुमहत्स्वपि कृच्छ्रेषु रामानिर्विण्णदर्शनाः॥३॥६६।१४ हे रामा ! तुझ्यासारखे सर्वज्ञानसंपन्न लोक, केवढीही मोठी संकटे आली, तरी विषादरहित असतात. कधीही शोक करीत नाहीत. १६३. त्वं तु बालस्वभावश्च बुद्धिहीनश्च राक्षस । ज्ञातव्यं तं न जानीषे कथं राजा भविष्यसि॥३॥३३॥८ . हे राक्षसा! तुझा बालभाव अजून गेला नाही. तूं बुद्धिहीन आहेस. जे जाण‘ण्यास योग्य तें तूं जाणत नाहीस. तूं राजा कसा होणार? १६४. त्वं पुनर्जम्बुका सिंहीं मामिहेच्छसि दुर्लभाम् । नाहं शक्या त्वया स्प्रष्टुमादित्यस्य प्रभा यथा३।४७।३७ - तूं तर कोल्हा असून दुर्लभ अशा सिंहपत्नीची-माझी-इच्छा करीत आहेस: -सूर्यापासून सूर्यप्रभा वेगळी करून स्पर्श करणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे तूं मला स्पर्श करणे ही गोष्ट शक्य नाही. १६५. दण्ड एव परो लोके पुरुषस्येति मे मतिः। धिक्क्षमामकृतज्ञेषु सान्त्वं दानमथापि वा।६।२२।४६ ( अकृतज्ञ अनुपकारी पुरुषाला ) दंड करणे, ही गोष्ट पुरुषाची मोठी कार्यसिद्धि "घडवून आणणारी आहे, असे मला वाटते. अकृतज्ञाला क्षमा करणे, सामोपचा रांच्या गोष्टी सांगणे, किंवा दान करणे, हे धिक्कारास्पद आहे. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri