पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. १५५. तदद्भुतं स्थैर्यमवेक्ष्य राघवे समं जनो हर्षमवाप दुःखितः । न यात्ययोध्यामिति दुःखितोऽभवत् स्थिरप्रतिज्ञत्वमवेक्ष्य हर्षितः ॥ २॥१०६।३४ रामाच्या अंगचे ( पितृवचनपालनरूप ) अद्भुत स्थैर्य पाहून लोकांना दुःख झाले, तसाच हर्षही झाला. रामचंद्र अयोध्येला येत नाही, म्हणून दुःख झाले, त्याप्रमाणे त्याच्या प्रतिज्ञेची स्थिरता पाहून त्यांना हर्ष झाला. १५६. तब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकाङ्कितम् । करिष्ये प्रतिजाने च रामो द्विाभिभाषते ॥२।१८।३० देवि (कैकेयि) ! राजाच्या मनांत जो कांही अभिप्राय असेल, तो सांग. राम कधीही ( परस्परविरुद्ध ) दोनदां बोलत नसतो. १५७. तन्मे दहति गात्राणि विषं पीतमिवाशये। हा नाथेति प्रिया सा मां ह्रियमाणा यदब्रवीत्॥६।५।७ (राक्षस) हरण करून नेत असतां प्रिया (सीता) 'हा नाथ' म्हणून मला जें बोलली, तें हृदयांतील प्यालेल्या विषाप्रमाणे माझ्या शरीरावयवांस दग्ध करति आहे. १५८. तपते यजते चैव यच्च दानं प्रयच्छति । क्रोधेन सर्व हरति तस्मात्क्रोधं विसर्जयेत् ॥ ॥७.५९ प्र. २।२२. मनुष्य में कांहीं तप करितो, यजन करितो, अथवा दान देतो, त्या सर्वांचा क्रोध नाश करितो; म्हणून क्रोधाचा त्याग करावा. १५९. तपो हि परमं श्रेयः संमोहमितरत्सुखम् ॥ ७/८४९ तप हे परम कल्याण करणारे आहे; इतर सुख मोह करणारे आहे. १६०. तीक्ष्णकामास्तु गन्धर्वास्तीक्ष्णकोपा भुजंगमाः। मृगाणां तु भयं तीक्ष्णं ततस्तीक्ष्णक्षुधा वयम्॥४।५९९, CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri