पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. हे राक्षसा ! अप्रतिम सुंदर अशा इंद्राणीचें धर्षण करणारा इंद्राच्या मागे ( कदाचित् ) चिरकाल जगेल, परंतु अमृतप्राशन करणारा असलास, तरी मजसारख्या स्त्रीचे धर्षण करणाऱ्या तुझी मृत्यूपासून सुटका होणार नाही. १५१. जेतव्यमिति काकुत्स्थो मर्तव्यमिति रावणः । धृतौ स्ववीर्यसर्वस्वं युद्धेऽदर्शयतां तदा ॥ ६।१०७७ ककुत्स्थकुलोत्पन्न रामाने रावणास जिंकावें, व रावणाने ( आपण ) मरावें, असा निश्चय करून स्ववीर्याचे सर्वस्व त्यांनी त्या काली युद्धांत दाखविलें. १५२. ज्येष्ठो भ्राता पिता वापि यश्च विद्यां प्रयच्छति । त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे च पथि वर्तिनः ॥४।१८।१३ जो धर्ममार्गानुसार वर्तन करितो, त्याचा ज्येष्ठ बंधु, पिता आणि विद्यादान करणारा गुरु, हे पितर होत, असें जाणावें. १५३. तडित्पताकाभिरलंकृताना मुदीर्णगम्भीरमहारवाणाम् । विभान्ति रूपाणि बलाहकानां रणोत्सुकानामिव वानराणाम् ॥ ४॥२८॥३१ ज्यांकडून गंभीर आणि मोठा शब्द उच्चारला जात आहे, अशी ही विद्युल्लतारूप पताकांनी शोभणारी मेघांची रूपें युद्धार्थ उत्सुक झालेल्या वानरांसारखी शोभत आहेत. १५४. ततः सुमन्त्रेण गुहेन चैव समीयतू राजसुतावरण्ये । दिवाकरश्चैव निशाकरश्च - यथाम्बरे शुक्रबृहस्पतिभ्याम् ॥ २।९९।४१ नंतर सूर्य आणि चंद्र हे जसे आकाशांत शुक्र आणि बृहस्पति यांच्याशी संयुक्त होतात-भेटतात, त्याप्रमाणे ते राजपुत्र-रामलक्ष्मण-अरण्यांत सुमंत (प्रधान), आणि गुह यांना भेटले. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri