पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २५ १४५. चन्द्रहीनमिवाकाशं तोयहीनमिवार्णवम् । अपश्यनिहतानन्दं नगरं ते विचेतसः॥ २॥४७॥१८ त्या विमनस्क जनांना चंद्रहीन आकाशाप्रमाणे, किंवा उदकविरहित समुद्राप्रमाणे, तें नगर आनंदरहित दिसले. १४६. चारेण विदितः शत्रुः पण्डितैर्वसुधाधिपः। - युद्धे स्वल्पेन यत्नेन समासाद्य निरस्यते ॥ ६।२९।२२ शहाण्या राजांनी चारांकडून-हेरांकडून-ज्याची माहिती मिळविली आहे, असा शत्रु युद्धभूमीवर प्राप्त झाला असतां, अल्प प्रयत्नाने नाश पावतो. १४७. छिन्ना भिन्ना प्रभिन्ना वा दीप्ता वाग्नौ प्रदीपिता। रावणं नोपतिष्ठेयं किं प्रलापेन वश्चिरम् ॥५।२६।१० मी ( रज्जूप्रमाणे ) छिन्न झाल्ये, ( भिंतीप्रमाणे ) भिन्न झाल्ये, ( घटाप्रमाणे ) फुटून गेल्ये, (भाजलेल्या मांसाप्रमाणे )दग्ध झालें, किंवा अग्नीकडून (गृहाप्रमाणे ) प्रदीप्त झाल्ये, तरी रावणास भजणार नाही. तुमच्यांशी दीर्घ काल भाषण करून मला काय करावयाचे आहे ? १४८. जानामि शीलं ज्ञातीनां सर्वलोकेषु राक्षस । हृष्यन्ति व्यसनेष्वेते ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥६।१६।३ । हे राक्षसा ! सर्व लोकांत ज्ञातींचा स्वभाव कसा असतो, ते मला ठाऊक आहे. आपल्या ज्ञातिजनांवर संकट आले असतां ह्या ज्ञाति आनंद पावतात. १४९. जीवन्त्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च॥२।२४।२१ पति हे जीवंत स्त्रीचे दैवत आहे, त्याप्रमाणे तो तिचा प्रभुही आहे. १५०. जीवेचिरं वज्रधरस्य पश्चा च्छची प्रधृष्याप्रतिरूपरूपाम् । न मादृशीं राक्षस धर्षयित्वा पीतामृतस्यापि तवास्ति मोक्षः ॥ ३॥४८।२४ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri