पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. marnama pornwaranand कार्याकार्यविचार न जाणणारा, दुर्मार्गाला लागलेला, व गर्विष्ठ, अशा गुरूसही दंड करणे योग्य होय. १४०. गृह्यन्ते यदि रोषेण त्वादृशोऽपि विचक्षणाः। ततः शास्त्रविपश्चित्त्वं श्रम एव हि केवलम् ॥५।५२।८ तुझ्यासारखे शहाणे लोक जर क्रोधाधीन होतात, तर मग शास्त्रज्ञानसंपादन म्हणजे केवळ वृथा श्रम होय. १४१. गोप्ने चैव सुरापे च चौरे भग्नव्रते तथा। निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः॥४।३४।१२ गोहत्या करणाराला, सुरापान करणाराला, चोराला, व्रतभंग करणाराला, विद्वानांनी निष्कृति सांगितली आहे; परंतु कृतघ्नाला निष्कृति नाही. १४२. गोदावरी प्रवक्ष्यामि हीना रामेण लक्ष्मण । आबन्धिष्येऽथवा त्यक्ष्ये विषमे देहमात्मनः॥३॥४५॥३७ पिबामि वा विषं तीक्ष्णं प्रवेक्ष्यामि हुताशनम् । न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥ ३॥४५॥३८ हे लक्ष्मणा ! रामविरहित मी गोदावरीत प्रवेश करीन, गळफास घेईन, किंवा उच्च प्रदेशावरून खाली उडी टाकून जीव देईन. नाहीतर तीक्ष्ण विषाचे मी सेवन करीन, अथवा अग्निप्रवेश करीन. राघवावांचून अन्य पुरुषास मी कधीही स्पर्श करणार नाही. १४३. गोब्राह्मणहितार्थाय देशस्य च हिताय च । ( तव चैवाप्रमेयस्य वचनं कर्तुमुद्यतः॥ श२६।५ .. गोब्राह्मणांच्या हिताकरितां, देशाच्या हिताकरितां, तसेंच अपरिमित तपःसंपत्तियुक्त जे आपण त्या आपल्या ( संतोषरूप ) हिताकरितां मी आपले वचन करण्यास सिद्ध झालो आहे. १४४.चतुर्णामाश्रमाणां हि गार्हस्थ्यं श्रेष्ठमुत्तमम्।।२।१०६।२२ चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हाच उत्तम होय. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri