पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २३ १३४. गर्जन्ति न वृथा शूरा निर्जला इव तोयदाः॥६।६५३ । शूर लोक, निर्जल मेघांप्रमाणे, व्यर्थ गर्जना करीत नसतात. १३५. गात्रेषु वलयः प्राप्ताः श्वेताश्चैव शिरोरुहाः। जरया पुरुषो जीर्णः किं हि कृत्वा प्रभावयेत्॥२।१०५।२३ ___गात्रांच्या ठिकाणी वळ्या पडल्या, मस्तकावरील केस शुभ्र झाले; असा जरेनें पुरुष जीर्ण झाला. तो कोणत्या उपायाने ति( जरे )चा परिहार करणार बरें? १३६. गायन्ति केचित्प्रहसन्ति केचि- न्नृत्यन्ति केचित्प्रणमन्ति केचित् । पठन्ति केचित्प्रचरन्ति केचित् प्लवन्ति केचित्प्रलपन्ति केचित् ॥ ५।६१।१६ __कित्येक ( वानर ) गाऊं लागले, कित्येक हसू लागले, कित्येक नाचूं लागले, कित्येक प्रणाम करू लागले, कित्येक पठण करूं लागले, कित्येक संचार करूं लागले, कित्येक उड्या मारू लागले, तर कित्येक बडबड करूं लागले. १३७. गुणवान्वा परजनः स्वजनो निर्गुणोऽपि वा । निर्गुणः स्वजनः श्रेयान् यः परः पर एव सः॥६।८७।१५ , परकी जन गुणी असला, आणि स्वजन निर्गुणी असला, तरी निर्गुणी स्वजन हाच श्रेष्ठ होय. कारण, जो शत्रु तो ( सर्वदा ) शत्रुच असावयाचा. |१३८. गुरुलाघवमर्थानामारम्भे कर्मणां फलम् । दोषं वा यो न जानाति स बाल इति होच्यते ॥२।६३।७ . कोणतेही काम हाती घेतले असतां तद्विषयक अर्थाचा चांगलेवाईटपणा, तसेच त्याचे फल अथवा दोष यांचा जो विचार करीत नाही, तो केवळ बाल होय, असे म्हटले आहे. १३९. गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः । उत्पथं प्रतिपन्नस्य कार्य भवति शासनम् ॥२।२१११३ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri