पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. aaaaa अग्नीचें तेज काष्ठाचे योगाने या लोकी जसें वृद्धिंगत होते, त्याप्रमाणे क्षत्रियांजवळ असलेलें धनुष्य, त्यांच्या तेजोबलाची वृद्धि करितें. १२८. क्षत्रियैर्धार्यते चापो नार्तशब्दो भवेदिति ॥ ३३१०३ (दुःखितांचा ) आर्तनाद होऊ नये, एवढ्याचकरितां क्षत्रियांकडून धनुष्य धारण केले जाते. १२९. क्षत्रियो निहतः संख्ये न शोच्य इति निश्चयः६।१०९।१९ क्षत्रिय रणांगणावर पडला असता, त्याजबद्दल शोक करूं नये, ही निश्चित गोष्ट आहे. १३०. क्षमया हि समायुक्तं मामयं मकरालयः। असमर्थ विजानाति धिक् क्षमामीदृशे जने॥६।२०२० क्षमाशील अशा मला हा समुद्र ( आपला पराजय करण्याचे कामी ) असमर्थ समजतो, त्या अर्थी अशा समुद्राविषयी (माझ्या मनांतील ) जी क्षमा तिला धिक्कार असो. १३१. गतिं खर इवाश्वस्य हंसस्येव च वायसः। नान्वेतुमुत्सहे वीर तव मागेमरिंदम ॥६।१२८१५ घोड्याच्या गतीचे अनुसरण करण्यास ज्याप्रमाणे गर्दभ उत्साह पावत नाही, किंवा हंसाच्या गतीचे अनुसरण करण्यास कावळा उत्साह पावत नाही, त्याप्रमाणे हे शत्रुदमना वीरा ! तुझ्या ( प्रजारक्षण ) मार्गाचे अनुसरण करण्यास मी उत्साह पावत नाही. १३२. गतिरेका पतिर्नार्या द्वितीया गतिरात्मजः। तृतीया ज्ञातयो राजश्चतुर्थी नैव विद्यते ॥ २।६।२४ हे राजा ! स्त्रियांना पहिली गति म्हणजे पति ही होय. त्यांची दुसरी गति म्हणजे पुत्र, आणि तिसरी गति म्हटली म्हणजे ज्ञाति होत. त्यांना चवथी गति म्हणून नाही. १३३. गतोदके सेतुबन्धो न कल्याणि विधीयते ॥ २।९।५४ : हे कल्याणि ! उदक निघून गेल्यावर सेतु-धरण-बांधून काय उपयोग होणार ? CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri