पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २१ २०४५४५४४५४४४ wwwwwwwwwwwwww ___उपकाराची प्रत्युपकाराने फेड करावी, हा सनातन धर्म होय. १२१. कृत्स्नाद्भयाज्ज्ञातिभयं सुकष्टं विदितं च नः॥६।१६।८ - सर्व भयांपेक्षां ज्ञातिभय हे अत्यंत कष्टकारक आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. १२२. कैकेयि मामकाङ्गानि मा स्पाक्षीः पापनिश्चये। . नहि त्वां द्रष्टुमिच्छामि न भार्या नच बान्धवी॥२॥४२॥६ ___ पापनिश्चये कैकेयि ! माझ्या अंगाला स्पर्श करूं नकोस. तूं माझी भार्या नाहीस; तुझा माझा आप्तसंबंधही काही नाही. तुला मी पाहूं इच्छीत नाही. १२३. कोपं न गच्छन्ति हि सत्त्ववन्तः ॥ ५।५२।१६ , सत्त्वशील मनुष्य कधीही कोपवश होत नाहीत. १२४. क्रुद्धः पापं न कुर्यात्कः क्रुद्धो हन्याद्गुरूनपि । क्रुद्धः परुषया वाचा नरः साधूनधिक्षिपेत् ॥ ५।५५।४ क्रुद्ध झाला असतां कोण बरें पाप करणार नाही ? क्रुद्ध ( पुरुष ) गुरूचाही वध करील. क्रुद्ध मनुष्य आपल्या कठोर भाषणाने साधूंनाही टाकून बोलेल. १२५. क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः । क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः सर्व क्रोधोऽपकर्षति । ॥७५९ प्र. २२१ क्रोध हा प्राणहरणकर्ता शत्रु होय. क्रोध हा मित्रमुख शत्रु-हितशत्रु-आहे. क्रोध अत्यंत तीक्ष्ण असा खड्ग आहे. क्रोध हा सर्वनाशक आहे. १२६. क्षत्रियाणां तु वीराणां वनेषु नियतात्मनाम् । धनुषा कार्यमेतावदार्तानामभिरक्षणम् ॥ ३।९।२६ क्षत्रिय वीरांचा धर्म म्हटला म्हणजे वनांत राहून मनोनिग्रह करणाऱ्या पीडित जनांचे धनुष्याच्या साह्याने रक्षण करणे, हा होय. १२७. क्षत्रियाणामिह धनुर्हताशस्येन्धनानि च । समीपतः स्थितं तेजो बलमुच्छ्रयते भृशम् ॥ ३।९।१५ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri