पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. कालाचे अतिक्रमण करणे ही गोष्ट दुःसाध्य आहे. ११४. किं त्वामन्यत वैदेहः पिता मे मिथिलाधिपः । राम जामातरं प्राप्य स्त्रियं पुरुषविग्रहम् ॥ २॥३०॥३ हे रामा ! माझा पिता मिथिलापति विदेहराज - जनक - यास, आकृतीने मात्र पुरुष, परंतु वस्तुतः स्त्री अशा तुम्हां जांवयांची प्राप्ति होऊन काय बरें वाटले असेल? ११५. कीर्त्यर्थं तु समारम्भः सर्वेषां सुमहात्मनाम् ॥७।४५।१३ सर्व महात्म्यांचा उत्तम आरंभ म्हणजे कीर्तीकरितांच होत असतो. ११६. कुलीनमकुलीनं वा वीरं पुरुषमानिनम् । चारित्रमेव व्याख्याति शुचिं वा यदि वाशुचिम् ॥२।१०९।४ पुरुष कुलीन आहे, की अकुलीन आहे; वीर आहे किंवा अधीर आहे; पवित्र आहे की अपवित्र आहे, हे त्याच्या चारित्र्यावरून कळून येते. ११७. कृतकृत्या हि वैदेही छायेवानुगता पतिम् । न जहाति रता धर्मे मेरुमर्कप्रभा यथा ॥२।४०।२४ सूर्याची प्रभा जशी मेरुपर्वताचा कधीच त्याग करीत नाही, त्याप्रमाणे धर्माचे ठिकाणी रत होत्साती धन्य सीता छायेप्रमाणे सर्वदा पतीच्या मागे असते. ११८. कृतं न प्रतिकुर्याद्यः पुरुषाणां हि दूषकः ॥४।३८।२६ । पुरुषांमध्ये तोच धर्मनाशक होय, जो केलेल्या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करीत नाही. ११९. कृतार्था ह्यकृतार्थानां मित्राणां न भवन्ति ये । तान्मृतानपि क्रव्यादाः कृतघ्नानोपभुञ्जते ॥४।३०।७३ जे स्वतः कृतार्थ होऊन कृतकार्य न झालेल्या आपल्या मित्रांच्या उपयोगी पडत नाहीत, त्या कृतघ्नांस मेल्यावर श्वानादि मांसभक्षक पशु सुद्धां भक्षण करीत नाहीत. १२०. कृते च प्रतिकर्तव्यमेष धर्मः सनातनः॥५।१।१०६ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri