पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. १०७. कश्चिदाम्रवणं छित्त्वा पलाशांश्च निषिञ्चति । पुष्पं दृष्टा फले गृध्नुः स शोचति फलागमे ॥२१६३।८ जो कोणी आम्रवन तोडून पलाश वृक्षांचे सिंचन करितो, व त्या पळसांचें पुष्प पाहून फळही तसेंच मिळेल, अशी आशा करितो, तो फलप्राप्तिकालीं शोक पावतो. १०८. कामं दृष्टा मया सर्वा विश्वस्ता रावणस्त्रियः। न तु मे मनसा किंचिद्वैकृत्यमुपपद्यते ॥ ५।११।४२ परपुरुष आपणाला पाहील, अशी यत्किंचितही शंका ज्यांच्या मनांत नाही, अशा रावणस्त्रिया मी पाहिल्या, परंतु माझ्या मनावर त्याचा कांहींच विकारपरिणाम झाला नाही. १०९. कायेन कुरुते पापं मनसा संप्रधार्य तत् । अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कम पातकम् ॥२।१०९।२१ मनुष्य प्रथमतः अंतःकरणांत पापकर्माचा निश्चय करितो; नंतर त्या पापाचा जिव्हेनें उच्चार करितो, व तदनंतर देहाने त्याचे आचरण करितो, असें तीन प्रकारचे पापकर्म आहे. ११०. कार्याणां कर्मणा पारं यो गच्छति स बुद्धिमान् ॥ ६।८८।१४ जो कृति करून कार्यांच्या पार जातो, तो बुद्धिमान् होय. १११. कार्यार्थिनां विमर्दो हि राज्ञांदोषाय कल्पते॥७।५३।२४ कार्यार्थी लोकांचा कलह म्हटला म्हणजे राजांना दोषास्पद होतो. ११२. कार्ये कर्मणि निवृत्ते यो बहून्यपि साधयेत् । पूर्वकार्याविरोधेन स कार्य कर्तुमर्हति ॥ ५॥४१॥५ मुख्य कार्य सिद्धीला गेले असता, त्या पूर्वकार्यास विरोध न येईल, अशा रीतीने दुसरोंही बहुत कार्ये जो करितो, तोच कार्य करण्याविषयी योग्य होतो. ११३. कालो हि दुरतिक्रमः॥३६८।२१ CC-0Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri