पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ___ तूं निद्रावश होत नाहीस ना ? तूं योग्य काली जागृत होतोस ना ? उत्तररात्री द्रव्यप्राप्ति कोणत्या उपायाने होईल, याचे चिंतन करितोस ना ? - १००. कच्चिन्मन्त्रयसे नैकः कच्चिन बहुभिः सह । कच्चित्ते मन्त्रितो मन्त्रो राष्ट्रं न परिधावति॥२।१००।१८ ____तूं आपल्या स्वतःशीच एकटा अथवा अनेक मंडळीशी मसलत करीत नाहीस ना ? तूं केलेली मसलत नगरांत सर्वत्र प्रसिद्ध होत नाही ना ? १०१. कथं राजा स्थितो धर्मे परदारान्परामृशेत् ॥ ३॥५०॥६ - (प्रजापालनरूप ) धर्माचे ठिकाणी स्थित असणारा राजा परस्त्रीला कसा बरें स्पर्श करील ? १०२. कन्यापितृत्वं दुःखं हि सर्वेषां मानकाशिणाम्।।७।९।१० ___सर्व मानी मनुष्यांना पोटीं कन्या येणे म्हणजे खरोखर दुःख होय. १०३. कर्णवन्ति हि भूतानि विशेषेण तुरङ्गमाः । ___ यूयं तस्मानिवर्तध्वं याचनांप्रतिवेदिताः ॥२।४५।१५ हे अश्वांनो ! तुम्ही विशेषेकरून कर्णयुक्त प्राणी आहां, त्या अर्थी मागे फिरा. ( बहिन्यांसारखे पुढे जाऊ नका. ) आमची याचना तुम्ही जाणतच आहां. १०४. कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः॥२५६।२२ . हे लक्ष्मणा ! चिरकाल जीविताची इच्छा करणाऱ्यांनी वास्तुशांति करावी. १०५. कर्म लोकविरुद्धं तु कुर्वाणं क्षणदाचर। तीक्ष्णं सर्वजनो हन्ति सर्प दुष्टमिवागतम् ॥ ३।२९।४ ( हे राक्षसा ! प्राप्त झालेल्या क्रूर व दुष्ट सर्पाचा सर्व लोक वध करितात. त्याचप्रमाणे लोकविरुद्ध कर्म करणाऱ्याचाहि सर्व प्राण हरण करितात. १०६. कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति माम् । एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ॥ ६।१२६।२ मनुष्य जीवंत राहिल्यास, शंभर वर्षांनी का होईना, त्याला आनंद प्राप्त होतो. ही लोकप्रसिद्ध म्हण कल्याणप्रद आहे, असे मला वाटते. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri