पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ८०. उपायकुशलो ह्येव जयेच्छनतन्द्रितः ॥ ६।८।१२ उपाययोजनेंत कुशल अशा मनुष्याने आळस टाकून शत्रूस जिंकावें. ८१. उभे सन्ध्ये शयानस्य यत्पापं परिकल्प्यते । तच पापं भवेत्तस्य यस्यार्योऽनुमते गतः ॥ २७५।४४ ज्याची अनुमति मिळवून आर्य-श्रीरामचंद्र-वनवासाला गेला, त्यास सकाळसंध्याकाळी निद्रा करणाऱ्याला जे पाप लागते, तें लागावें. ८२. ऋद्धियुक्ता हि पुरुषा न सहन्ते परस्तवम् ॥२।२६।२५ _ वैभवयुक्त पुरुषांस दुसऱ्याची स्तुति सहन होत नाही. ८३. एक एव हि वन्ध्यायाः शोको भवति मानसः। अप्रजास्मीति संतापो न ह्यन्यः पुत्र विद्यते ॥ २॥२०॥३७ पुत्रा ! वंध्येला ( मला संतति नाही, असा ) एकच मानसिक शोक असतो; इतर कोणतेही दुःख तिला असत नाही. ८४. एकाङ्गहीनं ह्यस्त्रेण जीवितं मरणाद्वरम् ॥२।९५प्र.५३ अस्त्राने एकांगहीन झालेले जीवित मरणापेक्षा श्रेष्ठ होय. | ८५. एकैकस्योपकारस्य प्राणान्दास्यामि ते कपे । । शेषस्यहोपकाराणां भवाम ऋणिनो वयम् ॥७॥४०॥२३ । हे कपे ! तुझ्या एकेका उपकाराकरितां मी प्राण देईन. शेष राहिलेल्या उपका रांचे बद्दल आम्ही तुझे ऋणी राहूं. | ८६. एतदर्थ हि राज्यानि प्रशासति नराधिपाः। यदेषां सर्वकृत्येषु मनो न प्रतिहन्यते ॥ २।५२।२५ | राजे लोक याकरितांच राज्य करितात की, ( कामक्रोधादिविषयक प्रवृत्ति करणाऱ्या) कोणत्याही कृत्यांत आपला मनोभंग होऊ नये. | ८७. एष स्वभावो नारीणामनुभूय पुरा सुखम् । अल्पामप्यापदं प्राप्य दुष्यन्ति प्रजहत्यपि ॥२॥३९।२१ स्त्रियांचा असा स्वभाव असतो की, पूर्वी सुखाचा अनुभव घेऊन पुढे CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri