पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ७४. उद्विजन्ते यथा सन्निरादनृतवादिनः। धर्मः सत्यपरो लोके मूलं सर्वस्य चोच्यते॥२।१०९।१२ सर्पापासून जशी लोकांना भीति असते, त्याचप्रमाणे असत्यवादी मनुष्यापासून लोकांना भीति असते. ज्यांत सत्य मुख्य आहे, असा जो धर्म, तोच लोकांत ( सर्व इष्टप्राप्तीचे ) मूळ आहे, असे सांगतात. ७५. उद्वेजनीयो भूतानां नृशंसः पापकर्मकृत् । त्रयाणामपि लोकानामीश्वरोऽपि न तिष्ठति ॥ ३॥२९॥३ जो भूतमात्रांना उद्विग्न करितो, जो पापकर्मी व दुष्ट असतो, तो तीनही लोकांचा ईश्वर-प्रभु-झाला, तरी फार कालपर्यंत टिकणार नाही. ७६. उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥ ४।८।२१ उपकाररूप फल हे मित्रत्वाचे लक्षण व अपकार करणे हे शत्रुत्वाचे लक्षण होय. ७७. उपकारेण वीरस्तु प्रतिकारेण युज्यते । अकृतज्ञोऽप्रतिकृतो हन्ति सत्त्ववतां मनः॥४।२७।४५ वीर पुरुषावर कोणीही उपकार केला असतां, तो वीर पुरुष प्रत्युपकार करितोच. उपकार न जाणून प्रत्युपकार न करील, तर तो सत्त्वशील पुरुषांचा मनोभंग करितो. ७८. उपभुक्तं यथा वासः स्रजो वा मृदिता यथा । एवं राज्यात्परिभ्रष्टः समर्थोऽपि निरर्थकः ॥३॥३३॥१९ उपभोगिलेले वस्त्र, शुष्क झालेली पुष्ममाला, ही जशी निरर्थक होतात, त्याप्रमाणे राज्यापासून भ्रष्ट झालेला ( राजा ) समर्थ असूनही निरर्थक होय. ७९. उपशान्तवणिक्पण्या नष्टहषो निराश्रया । अयोध्या नगरी चासीन्नष्टतारमिवाम्बरम् ॥२॥४८॥३५ जेथील वैश्यजनांचे व्यापाऱ्यांचे-व्यवहार बंद झाले आहेत, आणि लोकांचा हर्ष नाहीसा होऊन ते निराश्रय झाले आहेत, अशी अयोध्या नगरी, तारे लुप्त होऊन निस्तेज ( दिसणाऱ्या ) आकाशाप्रमाणे, झाली आहे. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri