पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. अल्पही विपत्ति आली असता, त्या ( पतीला )दोष देतात, किंवा त्याचा त्यागही करितात. ८८. एषा हि प्रकृतिः स्त्रीणामासृष्टे रघुनन्दन ।। समस्थमनुरज्यन्ते विषमस्थं त्यजन्ति च ॥३।१३।५ स्त्रीसृष्टि निर्माण झाल्यापासून स्त्रियांचा स्वभावच असा दिसून येतो की, चांगल्या स्थितीत ( पति ) असल्यास त्या त्याचे अनुरंजन करितात. परंतु तो विषम-दरिद्री-स्थितीत असल्यास त्या त्याचा त्याग करितात. ८९. एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः। तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत् ॥२।१०७।१३ गुणवंत आणि बहुश्रुत असे अनेक पुत्र असावे, अशी इच्छा ( मनुष्याने) करावी. कारण, त्या एकत्र झालेल्या पुत्रांतून एखादा तरी ( पितरांच्या स्वर्गप्राप्त्यर्थ ) गयेला जाईल. ९०. ऐश्वर्यमदमत्तो हि सर्वोऽहमिति मन्यते ॥५।६४।१९ ऐश्वर्याच्या मदानें मत्त झालेला प्रत्येक इसम — मीच ( प्रभु )' असे मानतो. ९१. ऐश्वर्ये वा सुविस्तीर्णे व्यसने वा सुदारुणे । - रज्ज्वेव पुरुषं बद्धा कृतान्तः परिकर्षति ॥ ५।३७।३ अत्यंत विपुल ऐश्वर्याच्या स्थितीत काय, किंवा महाभयंकर संकटाच्या स्थितीत काय, यम पुरुषास दोरीने बद्ध करून आकर्षण करीत असतो. ९२. औरस्यानपि पुत्रान्हि त्यजन्त्यहितकारिणः। समर्थान्संप्रगृह्णन्ति जनानपि नराधिपाः ॥ २।२६।३६ राजे लोक औरस पुत्रांचा, ते अहित करणारे असल्यास, त्याग करितात, आणि समर्थ अशा प्राकृत मनुष्यांचाही संग्रह करितात. ९३. कच्चिजानपदो विद्वान्दक्षिणः प्रतिभानवान् । यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पण्डितः॥२॥१००।३५ हे भरता! स्वदेशांतील विद्वान् , हुशार, बुद्धिमान् , आज्ञेनुसार वागणारे आणि चतुर दूत तूं ठेविले आहेसना ? CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri