पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ६९. इदं शरीरं निःसंज्ञं बन्ध वा घातयस्व वा। नेदं शरीरं रक्ष्यं मे जीवितं वापि राक्षस ॥३५६।२१ न तु शक्यमपक्रोशं पृथिव्यां दातुमात्मनः॥३५६।२२ हे राक्षसा ! हे जड शरीर बांधून ठेव, अगर याचा घात कर. माझी पृथ्वीवर निंदा होणार असेल तर शरीर काय, अथवा जीवित काय, यांचे रक्षण मला करावयाचें नाही. ७०. इदं तु मम दीनस्य मनो भूयः प्रकर्षति । यदिहास्य प्रियाख्यातुर्न कुर्मि सदृशं प्रियम् ॥६।१।१२ एष सर्वस्वभूतस्तु परिष्वङ्गो हनूमतः । मया कालमिमं प्राप्य दत्तस्तस्य महात्मनः॥ ६।१।१३ सीतेचा शोध आणणाऱ्या ह्या वानराचें-मारुतीचें-त्याने केलेल्या कार्यानुरूप प्रिय मी करूं शकत नाही, त्यामुळे माझें मन अत्यंत व्यथित होत आहे. तरीही माझें सर्वस्वसूत असें में आलिंगन, ते ह्या समयीं ह्या महात्म्या हनुमंताला-मारुतीला-मी देत आहे. ७१. उत्तरं नोत्सहे वक्तुं दैवतं भवती मम । वाक्यमप्रतिरूपं तु न चित्रं स्त्रीषु मैथिलि ॥३।४५।२९ हे मैथिलि ( सीते ) ! तूं माझें दैवत असल्यामुळे माझ्याने तुला उत्तर देववत नाही. स्त्रियांनी अनुचित भाषण करणे, ह्यांत कांही आश्चर्य नाही. ( हैं साहजिक आहे.) ७२. उत्साहवन्तः पुरुषा नावसीदन्ति कर्मसु ॥४।१।१२३ उत्साहयुक्त पुरुष कोणत्याही कार्यांत क्लेश पावत नाहीत. ७३. उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् । सोत्साहस्य हि लोकेषु न किंचिदपि दुर्लभम्॥४।१।१२२ हे आर्या ! उत्साह हा ( अत्यंत ) बलवान् आहे. उत्साहाहून दुसरें श्रेष्ठ असें बल नाही. उत्साही पुरुषाला लोकांमध्ये दुर्लभ असे काहीच नाही. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri