पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. हे रावणा ! अर्थ, अथवा काम, अथवा धर्म यांसंबंधी शास्त्रापासून ज्ञान झाले नाही, तर शिष्ट लोक राजाला अनुसरून, यांचें-अदिकांचेंआचरण करितात. ३५. अर्थानान्तरे बुद्धिनिश्चितापि न शोभते । घातयन्तीह कार्याणि दूताः पण्डितमानिनः ॥५।२।३८ ( स्वामीकडून सचिवांसह ) कार्याकार्यविचार होऊन निश्चित बुद्धि ठरलेली असली, तरी तिचा दूताने स्वतंत्रपणे उपयोग करूं नये. आपणास पंडित-शहाणेम्हणविणारे व तदनुरूप वागणारे दूत कार्यनाश घडवून आणितात. ३६. अर्थिनः कार्यनिवृत्तिमकर्तुरपि यश्चरेत् ।। तस्य स्यात्सफलं जन्म किं पुनः पूर्वकारिणः॥४।४३।७ ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केला नाही, अशा अर्थिजनाची-याचकाचीकार्यासद्धि केल्याने जीवित सफल होईल; मग ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केले आहेत, त्याचे कार्य केल्याने तें ( जीवित ) सफल होईलच, हे कशाला सांगितले पाहिजे ? ३७. अर्थिनामुपपन्नानां पूर्व चाप्युपकारिणाम् । आशां संश्रुत्य यो हन्ति स लोके पुरुषाधमः॥४।३०।७१ पूर्वी ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत, अशा याचकांना त्यांच्या कार्यसिद्धीच्या कामी वचन देऊन जो कार्यहानि करितो, तो पुरुष लोकांमध्ये अधम होय. ३८. अर्थी येनार्थकृत्येन संबजत्यविचारयन् । तमर्थमर्थशास्त्रज्ञाः प्राहुराः सुलक्ष्मण ॥ ३॥४३॥३४ हे भल्या लक्ष्मणा ! कोणी पुरुष एखाद्या अर्थाची अपेक्षा करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करितो, तो विचार न करितां केलेला असला, तरी अर्थशास्त्रज्ञ शहाणे लोक त्यास ' अर्थच ' म्हणत असतात. ३९. अर्थेन हि विमुक्तस्य पुरुषस्याल्पचेतसः । विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा।६।८३३३३ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri