पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. गुहा ! तूं सैन्य, कोश, किल्ले, तसेच देश, यांसंबंधी सावधान रहा. कारण, राज्याचे रक्षण करणे म्हणजे अत्यंत कठीण होय, असें मानिलें आहे. ३०. अमृतं विषसंपृक्तं त्वया वानर भाषितम् । यच नान्यमना रामो यच्च शोकपरायणः ॥ ५॥३७२ हे वानरा ! तुझें भाषण विषमिश्रित अमृतासारखे आहे. ' रामाचे मन (तुजवांचून ) कोणत्याही ठिकाणी आसक्त होत नाही, हे जे तूं बोललास, तें अमृतासारखें, व 'राम ( तुजसंबंधी ) शोकपरायण झाला आहे,' असें जें तूं सांगितलेंस, ते मला विषासारखे वाटत आहे. ३१. अयं हि सागरो भीमः सेतुकर्मदिदृक्षया । ददौ दण्डभयागाधं राघवाय महोदधिः ॥६।२२।४७ ह्या भयंकर महोदधि सागराने, दंडाच्या भीतीमुळे, सेतुकार्य पाहाण्याची इच्छा धरून राघवास ( आपला ) ठाव दिला. ३२. अयुक्तचारं दुर्दर्शमस्वाधीनं नराधिपम् । वर्जयन्ति नरा दूरान्नदीपङ्कमिव द्विपाः ॥३।३३।५ जो राजा ( राष्ट्रांतील बातम्या समजाव्या म्हणून ) हेरांची योजना करीत नाहीं, (प्रजाजनांस ) दर्शन देत नाही, अस्वाधीन-स्त्रियादिकांच्या परतंत्र असतो, त्याला नदीतील चिखल पाहतांच हत्ती नदीचा त्याग करून जातात, त्याप्रमाणे लोक वर्ण्य करितात. ३३. अरयश्च मनुष्येण विज्ञेयाश्छमचारिणः । विश्वस्तानामविश्वस्ताश्छिद्रेषु प्रहरन्त्यपि ॥ ४।२।२२ ० कपटानें संचार करणाऱ्या शत्रूचा मनुष्याने शोध घेत रहावे. कारण, ते सावध राहून, संधि सांपडली असतां, विश्वास पावलेल्या ( शत्रु )जनांवर प्रहार करण्यास चुकत नाहीत. ३४. अर्थं वा यदि वा कामं शिष्टाः शास्त्रेष्वनागतम् । व्यवस्यन्त्यनुराजानं धर्म पौलस्त्यनन्दन ॥ ३५०९ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri