पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. नाहा. - ग्रीष्म ऋतूंत ज्याप्रमाणे लहान लहान नद्या नाश पावतात-आटून जातात त्याप्रमाणे अर्थहीन आणि अल्पबुद्धि मनुष्याच्या सर्व क्रिया नाश पावतात.. ४०. अर्थेभ्योऽथ प्रवृद्धेभ्यः संवृत्तेभ्यस्ततस्ततः । क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः ॥६।८३३३२ - पर्वतांपासून ज्याप्रमाणे नद्या उत्पन्न होत असतात, त्याप्रमाणे संपादन केलेल्या आणि सर्वत्र वृद्धिंगत झालेल्या अर्थांपासून सर्व क्रिया सिद्ध होतात. ४१. अर्थो हि नष्टकार्यार्थैरयत्ने नाधिगम्यते ॥४।१।१२१ ज्या पुरुषांच्या कार्यामध्ये विघाड झाला आहे, अशा पुरुषांनी फिरून यत्न न केल्यास त्यांस त्या अर्थाची प्राप्ति होत नाही. ४२. अवश्यं लभते कता फलं पापस्य कर्मणः । घोरं प्रत्यागते काले द्रुमः पुष्पमिवार्तवम् ॥ ३।२९।८ ज्याप्रमाणे वृक्षावर त्या त्या ऋतुकालाला उचित अशी पुष्पें उत्पन्न होतात, त्याप्रमाणे पापकर्माचे दुःखरूप फल भोगकाल आला असतां काला अवश्य भोगावे लागते. ४३. अवश्यं प्राणिना प्राणा रक्षितव्या यथाबलम् ॥६।९।१४ प्रत्येक प्राण्याने आपले प्राण अवश्य यथासामर्थ्य रक्षण करावे. ४४. अविज्ञाय फलं यो हि कर्म त्वेवानुधावति । स शोचेत्फलवेलायां यथा किंशुकसेवकः ॥२।६३।९ जो पुरुष कर्माच्या फलाचा विचार न करितां तें कर्म करण्यास प्रवृत्त होतो, त्याची, फलवेला प्राप्त झाली असतां पलाशवृक्षाची ( फलप्राप्त्यर्थ ) सेवा करणायासारखी, शोकस्थिति होईल. ४५. अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्यथम् । उरःस्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ॥४॥३॥३१ अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्जनस्थया । कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ॥ ४॥३॥३३ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri