पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २३. अन्तकाले हि भूतानि मुह्यन्तीति पुरा श्रुतिः । राज्ञैवं कुर्वता लोके प्रत्यक्षा सा श्रुतिः कृता॥२।१०६।१३ अंतकाल प्राप्त झाला असतां प्राण्यांची बुद्धि विपरीत होते, असें पूर्वीपासून ऐकिवांत आहे; आणि ही गोष्ट, असें करणाऱ्या राजानें, आज लोकांत सिद्ध करून दाखविली आहे. २४. अपक्षो हि कथं पक्षी कर्म किंचित्समारभेत् ॥४।५९।२३ पक्षहीन पक्षी कोणत्याही कार्यास कसा बरें आरंभ करणार ? २५. अप्यहं जीवितं जह्यां त्वां वा सीते सलक्ष्मणाम् ।। न तु प्रतिज्ञां संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः ॥३।१०।१८ सीते! मी तुझा, लक्ष्मणाचा, व स्वतःच्या जीविताचाही त्याग करीन. परंतु कोणाजवळ, विशेषतः ब्राह्मणांजवळ, केलेल्या प्रतिज्ञेचा त्याग कधीही करणार नाही. २६. अप्यहं जीवितं जह्यां युष्मान्वा पुरुषर्षभाः। अपवादभयादीतः किं पुनर्जनकात्मजाम् ॥७।४५।१४ पुरुषश्रेष्ठांनो ! लोकापवादाला भिऊन मी स्वजीविताचा व तुमचाहि त्याग करीन; मग जनककन्येचा त्याग करीन, यांत आश्चर्य तें काय ? २७. अप्येव दहनं स्पृष्टा वने तिष्ठन्ति पादपाः । राजदण्डपरामृष्टास्तिष्ठन्ते नापराधिनः ॥६।२९।१२ । _ अग्नीने स्पर्श केलेले वृक्षही वनांत राहतात, परंतु राजदंडास पात्र झालेले अपराधी ( जीवंत ) राहात नाहीत. : २८. अप्रमत्तश्च यो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः । कृतज्ञो धर्मशीलश्च स राजा तिष्ठते चिरम् ॥३॥३३॥२० जो राजा ( सर्वदा ) सावधान, सर्वज्ञ, जितेंद्रिय, कृतज्ञ आणि धर्मशील असतो, तो चिरकाल राज्यावर स्थिर राहातो. २९. अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा। भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम् ॥२५२७२ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri