पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ - - - - - - - - - - - - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥ जबरीने अजीबात मारण्याचा वृथा हट्ट न धरिता योग्य संयमानें ती आपल्या ताब्यात ठेवून त्यांच्या स्वभावसिद्ध वृत्तींचा लोकसंग्रहार्थ उपयोग करून घेणे, हेच शहाण्या पुरुषाचे कर्तव्य होय असा श्लोकाचा भावार्थ आहे. तसेच सुख व दुःख हे दोन्ही विकार स्वतंत्र आहेत, एक दुसन्याचा अभाव नाही, हेहि ३४ व्या श्लोकांतील · व्यवस्थित' या पदावरून उघड होते (गीतार. प्र. ४, पृ. १०० व १३३ पहा). प्रकृ. तीच्या म्हणजे सृष्टीच्या अखंड खटाटोपांत आपल्याला नकात अशा गोष्टीहि कित्येकदा आपणांस करणे भाग पडते (गी. १८.५९ पहा); नाही म्हणून चालत नाही. अशा वेळी ज्ञानी पुरुष ही कमें निरिच्छ बुद्धीने केवळ कर्तव्य म्हणून करून त्यांच्या पापपुण्यापासून अलिप्स रहातो, आणि अडाणी यांतच आसक्ति ठेवून दुःख पावतो हा दोहोंमधला भासकीने वर्णिल्याप्रमाणे बुद्धि दृष्टया मोठा भेद आहे. परंतु आतां अशी शंका येते की इंद्रिये, जबरीने मारून कर्मस्याग न करितां निःसंग बुद्धीने सर्व कर्मे करावी असे जरी सिद्ध झाले, तरी ज्ञानी पुरुषाने युद्धासारखें हिंसात्मक घोर कर्म करण्यापेक्षा शेती, व्यापार किंवा भिक्षा इत्यादि निरुपद्रवी व सौम्य कर्म करणे अधिक प्रशस्त नम्हे काय ? भगवान् याचे हे उत्तर देतात की--] (३५) परक्याचा धर्म सुखाने आचरितां आला तरी स्यापेक्षा आपला धर्म म्हणजे चातुर्वर्ण्यविहित कर्म विगुण झणजे सदोष असले तरी तेच अधिक श्रेयस्कर आहे. स्वधर्माप्रमाणे (वागत असतां) मरण आले तरी स्थांत कल्याण आहे; (परंतु) परक्याचा धर्म भयंकर होय ! । [स्वधर्म म्हणजे स्मृतिकारांच्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेनें प्रत्येकाला शाबाने कावून दिलेला धंदा असा अर्थ आहे; मोक्षधर्म असा अर्थ नव्हे. गुण. - - -