पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ श्रीमद्भगवद्गीता. 5 सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्शानवानपि । प्रकृति यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥ इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ । तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥ ३४ ॥ जे वर्तन करीत नाहीत, ते सर्वज्ञानविमूढ म्हणजे पके मूर्ख अविवेकी बुडाले म्हणून समज. । [निकाम बुद्धीने सर्व कर्मे करण्यास सांगणारा कर्मयोगच श्रेयस्कर याबद्दल वर अन्वयव्यतिरेकाने जी फलश्रुति सांगितली आहे, तीवरून गीतेतील प्रतिपाद्य विषय काय ते पुरे व्यक्त होते. याच कर्मयोगनिरूप- णाच्या परिपूर्थ भगवान् प्रकृतीच्या प्राबल्याचे व तारोधार्य इंद्रिय- निग्रहाचे वर्णन करितात- (३३) ज्ञानवान पुरुष सुद्धा आपल्या प्रकृतिस्वभावानुरूप वागतो. सर्व भूते (आपआपल्या) प्रकृतीच्या वळणावर जातात; (तेथे) निग्रह म्हणजे अबरी काय करणार? (३४) इंद्रिय आणि (शब्दस्पादि) विषय यांच्यामधील प्रीति व द्वेष (ही दोन्ही) व्यवस्थित म्हणजे मूळचीच ठर- लेली आहेत. या प्रीतिद्वेषांच्या ताब्यांत आपण जाऊं नये; (कारण) ते. मनुष्याचे (वाटमारे) शत्रु होत. [तेतिसाव्या श्लोकांत निग्रह' शब्दाचा 'मुस्से संयमन' असा अर्थ मसून 'जबरी' किंवा 'हह' असा अर्थ आहे. इंद्रियांचे योग्य संयमन गीतेस इष्ट आहे; पण हाहाने किंवा जबरीने इंद्रियांच्या स्वाभा. विक वृसिहि अजीबात मारून टाकणे शक्य नाहीं असें येथे सांगणे आहे. उदाहरणार्थ, देह आहे तोपर्यंत भूक तहान १० धर्म प्रकृतिसिद्ध असल्याने मनुष्य कितीहि ज्ञानी असला तरी भूक लागली म्हणजे मिक्षा मागावयास तरी सो बाहेर पडतो; महणून इंद्रिये