पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ - - - - - - - - - - - - श्रीमद्भगवद्गीता. अर्जुन उवाच । 5 अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । कर्मविभागाने चातुर्वर्ण्यव्यवस्था सर्वाच्या कल्याणाकरितांच (गी. १८.४१) शास्त्रकारांनी प्रवृत्त केली असल्यामुळे ब्राह्मणक्षत्रियादि ज्ञानी झाले तरी त्यांनी आपआपले धंदे करणे यांतच त्यांचे व समाजाचे कल्याण असून दरएक वेळी या व्यवस्थेत ढवळाढवळ करणे योग्य नव्हे असें भगवंताचे सांगणे आहे (गीतार. पृ. ३३२ व ४९२ पहा). "जेनु काम सेना थी थाय । बीजो करे तो गोतां खाय" अशी जी एक गुजराती झण प्रचारांत आहे तिचा भावार्थहि हाच आहे. चातुर्वर्ण्य- व्यवस्था जेथें अमलांत नाही तेथेंहि, सर्व जन्म लष्करांत घातलेल्या मनुष्याने वेळ येईल तेव्हां शिंप्याचा धंदा करण्यापेक्षा लष्करी शिपा. याचा धंदा करणेच सर्वात श्रेयस्कर आहे, हे कोणीही कबूल करील, व तोच न्याय चातुर्वर्ण्यव्यवस्थेसहि लागू पडतो. चातुर्वपर्यव्यवस्था चांगली की वाईट, हा प्रश्न भिन्न असून तो येथे उपस्थितहि होत नाही. समाजाचे योग्य धारणपोषण होण्यास शेतीसारख्या निरुपद्रव व सौम्य धंद्याप्रमाणेच इतर कमहि अवश्य आहेत, एवढी गोष्ट निर्विवाद आहे. म्हणून कोणताहि धंदा एकदा स्वीकारिला,-मग तो चातुर्वर्ण्यव्यव- स्थेमुळे स्वीकारा किंवा खुषीने स्वीकारा-म्हणजे तो धर्म झाला. मग प्रसंगविशीं पुढे त्यांत खोड्या काढून आपले कर्तव्यकर्म सोडून देणे चांगले नाही, जरूर पडल्यास त्या धंद्यांतच मेले पाहिजे, असा या श्लोकांचा भावार्थ आहे. कोणताहि धंदा घेतला तरी त्यांत काहीना काही तरी दोष सहज काढता येण्यासारखा असतो (गी. १८.४८ पहा). परंतु तेवढ्यामुळे आपले नियत कर्तव्य सोडणे हा धर्म मनहे. महाभारतांत ब्राह्मणव्याधसंवाद व तुलाधारजाजलिसंवाद या दोन्ही प्रकरणांत हेच तत्व सांगितले असून, ३५ व्या श्लोकाचे पूर्वार्ध मनुस्मृतीत (मनु.