पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - - - - - - - - - - - - श्रीमद्भगवद्गीता. तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचार । परतु यावर संन्यासमार्गीयांचा पुढे अशी कोटि आहे की, आह्मी सिद्धि मिळविण्यासाठी कमें सोडितों असें नाही. कोणीहि झाला तरी या जगांत जे काही करितो ते आपल्या किंवा दुसऱ्याच्या फायद्यासाठी करितो. पण मनुष्याचे स्वतःचे परमसाध्य जी सिवावस्था किंवा मोक्ष तो ज्ञानी पुरुषास त्याच्या ज्ञानाने प्राप्त झालेला असतो; व त्यामुळे स्याला तदुत्तर दुसरे काही मिळवावयाचे रहात नसून (श्लोक 1७), कोणतीहि गोष्ट केली काय आणि न केली काय दोन्ही त्याला सारखीच असतात. बरें, लोकोपयोगार्थ त्याने कम केली पाहि- जेत असे म्हणावे तर लोकांच्या ठायींहि त्याचे काही अडले नसते (श्लो..). मग त्याने कर्म करावं कशाला? गीते, याला असे उत्तर आहे की, कर्म केले वा न केले ही दोन्ही जर तुला सारखीच तर कर्म न करण्याचा तरी तुझा आग्रह कशाला? जें जें शास्वतः प्राप्त होईल ते आग्रहशून्य बुद्धीने करून मोकळा हो म्हणजे झाले. या जगांत कर्म कोणालाच सुटले नाही; मग तो ज्ञानी असो वा अज्ञानी असो. कमे तर चुकत नाही आणि ज्ञात्याला ते स्वतःसाठी नको! दिसण्यांत ही एक मोठीच अडचण वाटत. पण गीतेला है कोई कठिण वाटत नसन गीता असे सांगते की, कर्म ज्या अर्थी चुकत नाही त्या अर्थी तं केलंच पाहिजे. पण स्वार्थबुद्धि उरली नाही म्हणूनच आतां ते निःस्वार्थ म्हणजे निष्काम बुद्धीने कर म्हणजे झाले. आणि हाच उपदेश 'तस्मात् ' हे पद घालून १९व्या श्लोकांत अर्जुनास केला असून त्याच्या दृढीकरणार्थ सर्वात श्रेष्ठ ज्ञानी जे भगवान त्यांस काही कर्तव्य राहिले नसतांहिते कर्मच करितात, हा दृष्टान्त पुढे २२ व्या श्लोकांत दिला आहे. सारांश, ज्ञानी पुरुषाची जी स्थिति संन्यासमार्गीय लोक वर्णितात तीच स्वरी धरून, तीवरून कर्मसंन्यासपक्ष सिद्ध न होता उलट सदैव निकाम कमें करण्याच्या पक्षासच जास्त बळकटी येते, असे गीतेचे म्हणणे आहे.