पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ॥ यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्व मानवः । आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥ १७॥ नव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥ वेदान्ता यावर शंका काढीत असतात. यासाठी तीवर गीतेचे उत्तर काय ते आतां पुढील तीन श्लोकांत सांगतात--] (१७) परंतु जो मनुष्य केवळ आम्म्यांतच रत, आत्म्यांतच तृप्त, आणि आल्याचे ठायींच संतुष्ट झाला त्याला (स्वतःचे म्हणून) कांही (शिल्लक) रहात नसत; (१८) तसेंच येथे म्हणजे या जगांत ( एखादी गोष्ट केल्याने त्याचा काही नफा नसतो आणि न केल्याने हि नसतो, आणि सर्व भूतांचे ठायीं त्याचा (स्वतःचा म्हणून) काही अर्थ मुंतून राहिलेला नसतो (१९) तस्मात् म्हणजे ज्ञानी पुरुष याप्रमाणे कसलीच अपेक्षा ठेवीत नसल्या मुळे तुंह (फलाचे टायी आसक्ति न ठेवितां (आपले) कर्तव्यकर्म नेहमी करीत जा. कारण आसक्ति, सोडून कर्म करीत असणाच्या पुरुषाला परमगति मिळते. १७ ते १९ या तीन श्लोकांचा टीकाकारांनी फारच विपर्यास केला । असल्यामुळे त्यांचा सरळ भावार्थ काय तो प्रथम सांगतो. तिन्ही श्लोक मिळून त्वनुमानयुक्त एक वाक्य आहे. पैकी १७ व १८ व्या श्लोकांत ज्ञानी पुरुषाने कर्म न करण्याची जी कारणे सामान्यतः दाख- विण्यात येतात त्यांचा प्रथम अनुवाद करून त्यावरून गीता जे अनु- मान काढिते ते 'तस्मात्' हा कारणबोधक शब्द प्रथम घालून १९ व्या श्लोकांत दिले आहे. निजणे, बसणे, उठणे, किंबहुना जिवंत रहाणे इ. में या जगांत सोडं म्हटल्याने सरत नाहीत. म्हणन कमैं सोडिल्याने नैष्कर्म्य होत नसून सिद्धि मिळविण्याचाहि तो उपाय नव्हे. असें या अध्यायाच्या आरंभी चवथ्या व पांचव्या श्लोकांत स्पष्ट म्हटले आहे.