पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ७५ असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९॥ परंतु कर्मयोगांतील हा युक्तिवाद व सिद्धान्त संन्यासमार्गीय टीकाका- रास मान्य नसल्यामुळे वरील कार्यकारणभावास, किंवा एकंदर अर्ध- प्रवाहास अगर पुढे सांगितलेल्या भगवंताच्या दृष्टान्तासहि (श्लोक ७. ८,९,२२, २५ व ३० पहा) न जुमानता, त्यादी हे तीन श्लोक फोडून स्वतंत्र मानिले आहेत; आणि त्यापैकी पहिल्या दोन श्लोकांत "ज्ञानी पुरुषाला स्वतःचे कांहीं कर्तव्य रहात नाही" इ. जो निर्देश आहे तोच गीतेचा अखेरचा सिद्धान्त कलान त्यावरून भगवान ज्ञानी पुरुषास कमें सोइण्यास सांगतात, असे प्रतिपादन केले आहे ! पण मग तिसन्या म्हणजे एकोणिसाव्या श्लोकांत आसक्ति सोडून कर्म कर " असा शो 'अर्जुनास लागलीच उपदेश केला आहे तो बिलग पडून त्याची पपत्ति । लागत नाही. ही अडचण दूर होण्यासाठी अर्जुनाला कर्म कर म्हणून जो उपदेश केला तो अर्जुन अज्ञानी म्हणून केला असें या टीकाकारांनी आपले समाधान करून घेतलं आहे ! पण इतके झाले तरी १९ च्या श्लोकांतील ' तस्मात् ' हे पद निरर्थक पडून याच अध्यायांतील पूर्वापर संदर्भास, आणि गीतेत अनेक ठिकाणी ज्ञानी पुरुषानेहि आसक्ति सोडून कर्म करावे असे उल्लेख आहेत त्यांस, अगर भगवानांनी पुढे दिलेल्या स्वताच्या दृष्टान्तासहि हा अर्थ विरुद्ध पडतो तो पड़तोच (गी. २.४७% ३.७,२५, ४. २३१६.११८.६-९; आणि गी. र. प्र.११पृ. ३१९-३२२ पहा). शिवाय कम करूनहि ज्यामुळे ती बंधक होत नाहींत (गी. २. ३९) त्या कर्मयोगाचच विवेचन या अध्यायांत चालू असता त्यात मध्येच उपटसुळासारखें। कम सोडणे उत्तम" असे कोणीहि समंजस मनुप्य सांगणार नाही. मग भगवानाची गोष्ट कशाला? म्हणून निव्वळ सांप्रदायिक आग्रहाचे व ओढाताणीचे हे अर्थ ग्राह्य धरितां येत नाहीत जीवन्मुक्त ज्ञानी पुरुषानहि कर्मे करावी हा अर्थ योगवासिष्ठात वार्णला