पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- श्रीमद्भगवद्गीता. प.यं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः। अघायुरिद्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६॥ असता " अनुयनं जगत्सर्व यज्ञश्चानुजगत्सदा " ( शां. २६७.३४)- यज्ञामागून जग व जगामागोमाग यज्ञ-असें जें वर्णन आहे, त्याचीहि ब्रह्म म्हणजे प्रकृति असा अर्थ केल्याने प्रस्तुत श्लोकाशी एकवाक्यता होते. कारण जग म्हणजेच प्रकृति होय. परमेश्वरापासून प्रकृति आणि त्रिगुणात्मक प्रकृतीपासून जगांतील सर्व कर्म कसे निष्पन्न होते, हे रहस्थाच्या सातव्या व आठव्या प्रकरणात सविस्तर सांगितले आहे. तसेच देवांनी प्रथम यज्ञ करूनच सृष्टि निर्माण केली असें पुरुषसूक्तां- तहि वर्णन आहे. - - - - - - - - - - - - - - - - - -- (१६) याप्रमाणे (जगाच्या धारणार्थ) सुरू केलेले चक्र, (म्हणजे कर्माचे अगर यज्ञाचे रहाटगाडगे) या जगांत जो पुढे पुढे चालवीत नाही, त्याचे आयुष्य पाएरूप असून या इंद्रियलंपटाचे (म्हणजे देवांना न देता स्वतःच चैन करणाराचे) जिणे हे पार्था ! व्यर्थ होय. [ब्रह्मदेवानेच--मनुष्याने नव्हे-लोकांच्या धारणपोषणार्थ यज्ञमय कर्म किंवा चातुर्वर्ण्याची वृत्ति उत्पन्न केली असून, सृष्टिक्रम चालण्यास (लोक १४) व त्याबरोबरच स्वतःचा निर्वाह होण्यास (श्लोक ८) मिळून दोन्ही कारणासाठी त्या वृत्तीची जरूर असल्यामुळे हे यशचक्र अनासक्त बुद्धीने या जगांत सतत चालू ठेविले पाहिजे, असे यावरून सिद्ध झाले म्हणजे मीमांसकांचे किंवा अयोधर्मातले कर्मकांड (यज्ञचक्र) गीताध. मांत अनासक्त बुद्धीच्या युक्तीने कसे कायम ठेविलें आहे ते सांगितले (गीतार. प्र. ११ पृ. ३४२-३४४ पहा). परंसु आत्मज्ञानी पुरुषास येथेंच मोक्ष प्राप्त होत असून जे काय मिळवावयाचे ते सर्व त्याला मिळाले असल्यामुळे त्याला या जगांत कोणतेच कर्म करण्याची जरूर रहात नाही, व त्याने करूहि नये, अशी कित्येक संन्यासमार्गीय