पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् । तस्मात्सर्वगनं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५ ॥ [ मनस्मृतींनहि याचप्रमाणे मनुष्याची व त्याच्या धारणास अवश्य लागणाच्या अन्नाची उत्पत्ति वणिली आहे. "यज्ञामधील अग्नीत दिलेली आहुति सूर्यास पोचते व मग सूर्यापासून (ह्मणजे परंपरेनें यज्ञापासून पर्जन्य व पर्जन्यापासून अन्न व अन्नापासुन प्रजा उत्पन्न होते," असा मनूचा श्लोक आहे (मनु. ३.७६); तोच महाभारतां- तहि आलेला आहे (म. भा. शां. २६२.११ पहा). तैत्तिरीय उपनिष- दास (२.१) ही पूर्वपरंपरा याच्याहि मागे नेऊन " परमात्म्यापासन प्रथम आकाश व पुढे क्रमाने वायु, अग्नि, पाणी व पृथ्वी उत्पन्न होऊन पृथ्वीपालन ओषधि, ओषधींपासून अन्न व अन्नापासून पुरुष झाला," असा क्रम दिला आहे. यासाठी त्याला अनुसरून प्राणीमात्राची कर्मापर्यत सांगितलेली पूर्वपरंपरा त्याच्या प्रकृति व प्रकृतीच्या मागे अखेर थेट अक्षर ब्रह्मापर्यंत नेऊन आतो पुरी करितात-] (१५) कर्माची उत्पत्ति ब्रह्मापासन म्हणजे प्रकृतीपासून (आहे असे) जाण, आणि हे ब्रह्म अक्षरापासून म्हणजे परमेश्वरापासून निघाले आहे. म्हणून सर्वगत ब्रह्मच नेहमी यहांत अधिष्ठित असते (असे समज). । [या श्लोकांत ब्रह्म या शब्दाचा अर्थ 'प्रकृति' असा न करिता कोणी 'वेद' असा करितात. " ब्रह्म म्हणजे वेद परमेश्वरापासून निघाल या अर्थाने हे वाक्य जरी खरे आहे, तरी " सर्वगत ब्रह्म यज्ञांत आहे" याचा अर्थ त्याने नीट लागत नाही. म्हणून “मम योनिमहत् ब्रह्म" (गी. १४.३) या श्लोकांत 'ब्रह्म पदाचा 'प्रकृति ' असा जो अर्थ आहे त्याला अनुसरून, 'ब्रह्म' शब्दाने येथेहि जगाची मूलभूत जी प्रकृति तीच विवक्षित आहे, हा रामानुजभाष्यांतील अर्थ आह्मांस बरा वाटतो. शिवाय महाभारताच्या शांतिपर्वात हेच यज्ञाचे प्रकरण चालू