पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० श्रीमद्भगवद्गीता. यशशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्विषैः । भुंजते ते त्वचं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ १३ ।। अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यशाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥ हे लोकसंग्रहकारक कर्म मनुष्यांनी पुढे चालू ठेवणे जरूर आहे असें स्मृतीतूनहि वर्णन असते; आणि तोच अर्थ आता पुढील श्लोकांत स्पष्ट .. करून दाखविला आहे- (१३) यज्ञ करून अवशिष्ट राहिलेल्या भागाचे ग्रहण करणारे सद्- गृहस्थ सर्व पापांपासून मुक्त होतात. परंतु ( यज्ञ न करितां केवळ) आप- ल्यासाठीच जे (अन्न) शिजविजात ते पापी लोक पाप भक्षण करतात. ऋग्वेद १०. ११७.६ या मंत्रांत हाच अर्थ असन "नार्यमणं पुष्यति नो सखायं केवलाघो भवति केवलादि"-जो अर्यमा किंवा सखा याचे पोषण करीत नाही, एकटाच भोजन करितो, तो केवळ पापी समजावा, असे त्यांत सांगितले आहे. तसेंच मनुस्मृतीतहि “ अधं स केवलं भुंक्त यः पचत्यात्मकारणात् । यज्ञशिष्टाशनं ह्येतत्सतामन्नं विधीयते।" (३. ११८)-जो आपल्याकरितांच (अन्न) शिजवितो तो केवळ पाप भक्षण करितो, यज्ञ करून जे शेष राहील त्यास 'अमृत' आणि इतर सर्व जेवून जे शेष राहील (भुक्तशेष) त्यास 'दिवस' (मनु. ३. २८५) हे नांब असून, तेंच अन्न शिष्ट लोकांस विहितं होय, असे श्लोक आहेत (गी. ४.३१ पहा). असो; यज्ञादि कमें केवळ तीळ तांदूळ अग्नीत जाळण्यासाठी किंवा नुस्त्या स्वर्गप्राप्तीसाठीहि नसून जगाचे धारणपोषण होण्यास त्यांची अवश्यकता कशी लागते, किंवा यज्ञावर सर्व जग कसे अवलंबून 'आहे, याचा आतां याहिपेक्षा अधिक खुलासा करितात-] (१४) प्राणिमात्र अन्नापासून होतात; अन्न पर्जन्यापासून उद्भवतें; पर्जन्य यज्ञा पासून होतो; व यज्ञाचा उन्नव कर्मापासून होतो. . - -. " - -. - -...-