पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ श्रीमद्भगवद्गीता. यस्त्विद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । कर्मेंद्रियः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७॥ नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणाः । (७) पण मनाने इंद्रियांचं आकलन करून, (केवळ) कर्मेंद्रियांनी अनासक्त बुद्धीने जो 'कर्मयोगाचा' आरंभ करितो त्याची योग्थता हे अर्जुना ! विशेष आहे. कर्मयोगांत कर्मापेक्षा बुद्धि श्रेष्ठ (गी. २. ४९ ) असे जे मागच्या अध्यायांत सांगितले त्याचंच या दोन श्लोकांत स्पष्टीकरण केलेले आहे. मन शाद नसतां केवल लोकांच्या भीतीने किंवा लोकांनी बरें ह्मणाव ह्मणून फक्त बाह्येद्रियांच्या व्यापारास आळा घालणारा पुरुष खरा सदाचरणी नव्हे, ढोंगी होय, असे वा श्लोकांत स्पष्ट म्हटले आहे. "कालौ कर्ता च लिप्यते "-कलियुगांत दोष बुद्धीत नसून कर्मात असतो-या वचनाचा आधार दाखवून बुद्धि कशीहि असो, कर्म वाईट असू नये म्हणजे झाले, असे प्रतिपादन करितात त्यांनी वरील श्लोकांत वणिलेले. गीतेतील तत्व विशेषतः लक्षात ठेविले पाहिजे. निष्काम बुद्धीने कमैं करण्याच्या योगा- सत्र 'कर्मयोग ' हे नांव गीतेत दिले आहे हे सातव्या श्लोकांवरून उघड होते. हा कर्मयोग सहाव्या श्लोकांत वर्णिलेल्या दांभिक मार्गापेक्षा श्रेष्ठ असला सरी संन्यासमार्गापेक्षा श्रेष्ट नाही असा या श्लोकाचा कित्येक संन्यासमागीय अर्थ करितात. पण ही कोटि सांप्रदायिक आग्र- हाची आहे. कारण संन्यासमार्गापेक्षा कर्मयोग आधिक योग्यतेचा किंवा श्रेष्ठ आहे असें या श्लोकांतच नव्हे, तर पुन: पांचव्या अध्यायाच्या आरंभी व इतरत्रहि स्पष्ट सांगितले आहे (गीतार. पृ. ३०४ व ३०५ पहा). कर्मयोग याप्रमाणे श्रेष्ठ असल्यामुळे आतां अर्जुनास याचेच. आचरण करण्याचा सपदेश करितात-