पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणाः ॥ ८ ॥ (८) (तुझ्या धर्माप्रमाणे) नियत ह्मणजे नेमलेले कर्म तूं कर. कारण कर्म न करण्यापेक्षां कर्म करणे हे अधिक चांगले होय. खेरीज (असें पहा की) कर्म न केलेस तर (खायाला न मिळतां) तुझा शरीरनिर्वाह सुद्धा चालावयाचा नाहीं. [खेरीज' व 'सुद्धा' (अपि च) या पदांनी शरीरयात्रा हा किमान- पक्षींचा हेतु सांगितला, आतां नियत' ह्मणजे नेमलेले कर्म' कोणते यतें दुसन्या कोणत्या महत्त्वाच्या कारणास्तव अवश्य केले पाहिजे. हे दाखविण्यासाठी यज्ञप्रकरणास सुरुवात करितात. यज्ञयागादि श्रौत धर्म सभ्यां लुप्तप्राय झाला असल्यामुळे या विषयाचे हसींच्या वाचकांस विशेष महत्व वाटत नाही. पण गीतेच्या वेळी हे यज्ञयाग पूर्ण प्रचा- रांत असल्यामुळे 'कर्म' शब्दाने यांचाच मुख्यत्वेकरून बोध होत असे, व त्यामुळे ही धर्मकृत्ये करावी का न करावी व करावी झटल्यास कशी करावी, याबद्दलचे विवेचन गीताधीत करणे अवश्य होते. शिवाय दुसरे असे लक्षात ठेविले पाहिजे की, यज्ञ ह्मणजे केवळ ज्योतिष्टोमादि श्रौत यज्ञ, किंवा अग्नीत कोणत्याहि द्रव्याचे हवन करणे, एवढाच अर्थ होत नाहीं (गी. ४. ३२ पहा). सृष्टि निर्माण करून तिचा क्रम सुरळीत घालण्यासाठी, म्हणजे लोकसंग्रहार्थ, सर्व प्रजेस ब्रह्मदेवाने चातुर्वर्ण्य- विहित जी जी कर्मे लावून दिली आहेत, त्या सर्वांचा 'यज्ञ' या शब्दांत समावेश होतो (म.भा. अनु. ४८, ३, व गां. र. . २८६-२९२ पहा); आणि हीच कमें धर्मशास्त्रात सांगितली असुन तीच नियत म्हणजे नेमलेले कर्म या शब्दांनी येथे विवक्षित आहेत. ह्मणून श्रौत यज्ञयाग सध्या लुप्तप्राय झाले असले, तरी यज्ञ- चक्रांचे हैं विवेचन सध्याहि निरर्थक नाही, असं ाटलं पाहिजे. असो; शास्त्राप्रमाणे पाहिले तर ही सर्व कम काम्य, मणने मनुष्याचे या जगांत -- - - - - - -