पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषातर वटीपा-अध्याय ३. इंद्रियान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥६॥ (गी. ५. ९ १८.११), कोणीहि मनुष्य कधीच कर्म शून्य होऊ शकत नाही. म्हणून कर्मशून्य रूपी नेष्कर्म्यहि अशक्य होय सारांश, कर्माचा विंचू कधीच ठार मरत नाही. यासाठी तो जेणेकरून निर्विष होईल अशीच काही तरी युक्ति काढिली पाहिजे. कर्माच्या ठिकाणी असलेली आपली आसक्ति सोडणे हीच ती युक्ति होय असा गीतेचा सिद्धान्त असून, तो पुढे अनेक ठिकाणी विस्तारानें वर्णिला आहे. पण यावरहि कोणी असा प्रश्न करील की, सर्व कर्मे सोडणे हे जरी नैष्कर्म्य नव्हे, तरी संन्यासमार्गी लोक सर्व कर्माचा संन्यास झणजे त्याग करून ज्या अर्थी मोक्ष मिळवितात त्या अर्थी मोक्षप्राप्ति सिद्ध होण्यास कर्म सोडणे जरूर आहे. पण या कोटिक्रमास गीतेचे असे उत्तर आहे की, संन्यासमार्गीयांस मोक्ष मिळतो खरा, पण तो त्यांनी कमैं सोडिल्यामुळे मिळत नसून, मोक्षसिद्धी हे त्यांच्या ज्ञानाचे फल होय; कमें साडून देण्यानेच जर सिद्धि मिळेल तर दगडालाहि माक्ति मिळाली पाहिजे म्हणून (१) नैष्कर्म्य म्हणजे कर्मशून्यता नव्हे, (२) कर्म सोडूं हटले तरीहि कोणाला तें सुटत नाही, आणि (३) कर्म सोडून देणे हा सिद्धि मिळविण्याया उपाय नव्हे, अशा तीन गोष्टी सिद्ध होतात आणि त्याच वरील श्लोकांत सांगितल्या आहेत. या तीन गोष्टी सिद्ध झाल्यावर आठव्या अध्यायांत हटल्याप्रमाणे 'नैष्कयसिद्धि' (गी. १८.४० व ४९ पहा.) प्राप्त होण्यास कम न सोडितां ज्ञानाने आस- क्तीचा क्षय करून कमें सदैव करीत रहाणे हाच काय तो एक मार्ग शिल्लक राहतो. कारण ज्ञान हेच जरी मोक्षाचे साधन नसले, तरी कर्मशून्य रहाणे कधीच शक्य नसल्यामुळे त्यांचे बंधत्व नाहीसे होण्यास आसक्ति सोडन ती करणे जरूर पडते. यासच कर्मयोग ह्मणतात व हाच ज्ञानकर्मसमुच्चयात्मक मार्ग विशेष योग्यतेचा ह्मणजे श्रेष्ठ असें आता सांगतात- (६) (हस्तपादादि) कमै आंवरून मनाने जो मूढ इंद्रियांच्या विष- यांचे चिंतन करीत राहतो, त्याला मिथ्याचार ह्मण ने दांभिक म्हणतात. - - - - - - - - - - -