पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. न कर्मणामनारंभानैष्कर्य पुरुषोऽश्रुते। न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥ न हि कश्चित्क्षणमणि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते हावशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५॥ सांगून नंतर कर्मनिष्ठेस सुरुवात केलेली आहे. पण 'पुरा' म्ह० सृष्टीच्या मूळारंभी असाहि अर्थ होऊ शकेल. कारण महाभारतांत नारायणीय किंवा भागवत धर्माचं निरूपण आहे तेथे सांख्य व योग (निवृत्ति व प्रवृत्ति ) या दोन निष्ठा स्वतंत्रपणे भगवंतांनी जगाच्या आरंभी उत्पन्न केल्या आहेत असे वर्णन आहे (शां. ३४० व ३४७ पहा). 'निष्ठा' शब्दामागे 'मोक्ष' हा शब्द अध्याहृत असून ज्या मागाने गेले असतां अखेर मोक्ष मिळतो तो मारी असा त्याचा अर्थ असून गीतेप्रमाणे अशा निष्ठा दोनच होत, व त्या दोन्हीहि स्वतंत्र आहेत, एक दुसन्यांचे अंग नव्हे, इत्यादि गोष्टींचे विस्तृत विवेचन गीतारहस्याच्या अकराव्या प्रकरणांत (पृ. ३०१-३१३) केले असल्यामुळे त्याची येथे पुनरुक्ति करीत नाही. या दोन निष्ठांमध्ये भेद काय तोहि कोष्टकरूपाने गीतार- हस्थाच्या १७ व्या प्रकरणाचे (पृ.३५१) अखेर दिला आहे. मोक्षाच्या दोन निष्ठा कोणत्या ते सांगितलं: आतां तदंगभूत जी अवश्य नैष्कर्म्य. सिद्धि तिचे स्वरूप स्पष्ट करून दाखवितात--] (४) (पण) कर्माना प्रारंभ केला नाही म्हणजे पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होते असे नाही; आणि कर्माचा संन्यास (त्याग) केला म्हणजे नेव- ख्यानेच सिद्धि मिळते असे नाही. (५) कारण कोणी झाला तरी (काहीना काही) कर्म केल्यावांचून क्षणभर देखील केव्हांहि रहात नाही. प्रकृतीचे गुण परतंत्र झालेल्या प्रत्येक इसमास ( नेहमी काहींना काही तरी) कर्म करण्यास लावीत असतात. । [चवथ्या श्लोकाच्या पहिल्या चरणांत 'नैष्कर्म्य' ह्मणजे 'ज्ञान' अमें मानून 'कर्माना आरंभ न केल्याने ज्ञान होत नाही, ह्मणजे कर्मानींच