पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - - - - - - - 0 ६२ श्रीमद्भगवद्गीता. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । ज्ञान होते, कारण कर्म हे ज्ञानाचे साधन आहे," असा संन्यासमार्गीय टीकाकारांनी या श्लोकाचा अर्थ आपल्या संप्रदायास अनुकूल करून घेतला आहे. पण हा अर्थ सरळ किंवा बरोबरहि नाही. नैष्कर्म्य हा शब्द वदान्त व मीमांस या दोन्ही शास्त्रांत पुष्कळदा येत असून सुरे- श्वराचार्याच्या 'नष्कयंसिद्धो' या नांवाचा याच विषयावर एक ग्रंथहि आहे. तथापि नैष्कांची ही तत्त्वं नवीन नसून सुरेश्वराचार्यांच्याच काय, पण मीमांसा व वेदान्त यांचरील सूत्रे होण्याच्याहि पूर्वीपासून चालत आलेली आहेत कर्म मारले हाणजे ते बंधन असावयाचे हे सांगा- वयास नको. ह्मणून पान्याचा उपयोग करण्यापूर्वी तोमारून ज्याप्रमाणे वैद्य शुद्ध करून घेतात तद्वत् कमें करण्यापूर्वी त्याचें बंधत्व किंवा दोष जेणेकरून नाहीसा होईल असा उपाय करावा लागतो, व अशा युक्तीने कम करण्याची जी स्थिति तिला नकर्म्य' असं म्हणतात. याम- माणे नांगी मोडलेले कर्म मोक्षाला प्रतिबंधक होत नसल्यामुळे ही स्थिति कशी संपादन करावी हा मोक्षशास्त्रांतील एक महत्वाचा प्रश्न आहे, मीमांसकांचे याला असें उत्तर आहे की, नित्य व निमित्त घडल्यास नैमित्तिक, ही कर्मे करावी, आणि काम्य व निषिद्ध करूं नयेत, म्हणजे कर्माचे बंधकत्व न रहातां नष्कावस्था सुलभरीत्या प्राप्त होते. पण मीमांसकांची ही युक्ति चुकीची आहे असा वेदान्तशास्त्राचा सिद्धान्त असून त्याचे गीतारहस्याच्या दहाव्या प्रकरणांत (पृ. २७१) विवेचन केले आहे. कर्मच केलें म्हणजे नाही त्याची बाधा तरी कशी लागणार? झणून नैष्कर्म्यावस्था प्राप्त होण्यास सर्व कर्मच सोडून द्यावे, असें दुसरे कित्येक प्रतिपादन करीत असतात. यांच्या मते 'नैष्कर्म्य' म्हणजे कर्मशून्यता होय. पण हे मत बरोबर नसून त्याने सिद्धि म्ह. मोक्षहि मिळत नाही असे चवथ्या श्लोकांत सांगितले असून, पांचव्या श्लोकांत स्याचे कारण दिले आहे. कर्म सोडण्याचे. मनांत आणिले तरीहि देह आहे तोपर्यंत निजणे, बसणे इ. कम कधीच बंद होत नसल्यामुळे