पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ श्रीमद्भगवद्गीता. नकि कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १।। व्यामिश्रेणेव वाक्येन युद्धि मोहयसीव मे। तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ।। २ ॥ श्रीभगवानुवाच । १६ लोकेऽस्मिन्द्धिविधा निष्टा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेण योगिनाम् ॥ ३ ।। करणे ही एकच युक्ति किंवा योग होय असे सांगून, अशा रीतीने ज्याची बुद्धि सम झाली त्या कर्मयोगी स्थितप्रज्ञाचे अस्त्रेर वर्णनहि करण्यांत आले. तथापि पवड्याने कर्मयोगाचे विवेचन पुरे होत नाही, कोणतेहि कम सम- बुद्धीने केले म्हणजे त्याचें पाप लागत नाही हे खरे. पण कर्मापेक्षां सम- बुद्धिच श्रेष्ठ हे जर निर्विवाद आहे (गी. २.४९), तर स्थितप्रज्ञाप्रमाणे बुद्धि सम केली म्हणजे झाले, कर्मे केलीच पाहिजेत, असे त्यामुळे सिद्ध होत नाही. म्हणून प्रश्नरूपाने अनुनाकडून हीच शंका उपस्थित झाल्यावर "कमे केलीच पाहिजेत" असे भगवान या व पुढील अध्यायांत प्रतिपादन करितात.] अर्जुन म्हणाला-(१) हे जनार्दन! कर्मापेक्षां (साम्य-) बुन्दि च श्रेष्ठ असें जर तुमचे मत आहे. नर हे केशवा ! मला (युद्धाच्या) घोर कति का घालितां ? (२) दिसण्यांत व्यामिश्र म्हणजे दुटप्पी अशा भाषणाने माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखें तुह्मी करीत आहां. तरी ज्याने मी श्रय म्हणजे कल्याण पावेन, तेवढे एकत्र निश्चित मला सांगा. श्रीभगवान् ह्मणाले--(३) हे निष्पाप अर्जुना ! पूर्वी (ह्मणजे अध्या- यांत ) ज्ञानयोगाने सांख्यांची आणि कर्मयोगाने योग्यांची अशी या लोकी दोन प्रकारची निष्ठा आहे असे मी सांगितले. 'पुरा'-पूर्वी ह्मणजे दुसन्या अध्यायांत असा अर्थ आही केला असून तो सरळ आहे. कारण दुसऱ्या अध्यायांत प्रथम सांख्यनिष्ठेप्रमाणे ज्ञान