पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा अध्याय २. ३१ - - - - - - - - - - - - - - - स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि । धाद्धि युद्धाच्छ्याऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥ त्याचा नाश झाल्यास त्यांत शोक करण्यासारखे काही नाही. परंतु यदृच्छने किंवा कालगतीने कोणी मेला किंवा कोणाला कोणी मारिलें म्हणून त्याचे सुख दुःख न मानितां शोक करण्याचे जरी सोडून दिले, सरी लढाईसारखें धार कर्म करण्यास मुहाम प्रवृत्त होऊन लोकांच्या देहाचा आपण का नाश करावा, या प्रश्नाने त्याचा निकाल होत नाही, कारण, देह जरी अनित्य असला तरी आत्म्याचे कायमचं कल्याण किंवा मोक्ष संपादन करण्यास देह हेच काय तें एक साधन असल्यामुळे आत्महत्या करणे, किंवा योग्य कारणाखेरीज दुसन्यास मारण, ही दोन्ही शास्त्राप्रमाणे घोर पातकेंच होन, म्हणून मेल्याचा शोक करण जरी योग्य नाही तरी एकाने दुसन्माला का मारावे याचे दुसरे काही तरी सबळ कारण सांगणे जरूर आहे. यालाच धर्माधर्मविवेक हे नाव असून गीतेतील खरा प्रतिपाद्य विपयहि तोच आहे. यासाठी आतां प्रथम सांगमागासहि संमत असलेल्या चानवायव्यवस्थेप्रमाणे लवाई करणे हं क्षत्रियांचे कर्तव्य असल्यामुळे मेल्याचा किंवा मारल्याचा तूं शोक करूं नको इतकेच नव्हे, तर लढाईत मरण किंवा मारणे या दोन्ही गोष्टी क्षात्रधर्माप्रमाणे तुला प्राप्तच आहेत असें भगवान् सांगतात---] (३१) शिवाय स्वधर्माकडे पाहिले तरीहि ( या वेळी ) कचरण तुला योग्य नाही. कारण, धर्मोचित युद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर असे दुसरे काही नाही. । [स्वधर्माची ही उपपत्ति पुढेहि दोनदां (गी. ३. ३५ व १८.४७) अली आहे. सैन्यास किंवा सांख्य मार्गाप्रमाण कर्मसंन्यापरूपी चतुर्था- श्रम ही जरी शेवटची पायरी असली तरी तत्पूर्वी ब्राह्मणाने ब्राहाणवर्म व क्षत्रियाने क्षत्रियधर्म चातुर्वण्यव्यवस्थेप्रमाणे पाळून गृहस्थाश्रम पुरा __ -- -