पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ श्रीमद्भगवद्गीता. दही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥ पहातो, तसेच दुसरा कोणी आश्चर्यासारखे याचे वर्णन करिता, आणि (त्याहून ) दुसरा कोणी जणू काय आश्चर्य म्हणून ऐकतो. पण (याप्र- माणे पाहून, वर्णन करून व) ऐकूनहि (यांपैकी) कोणी याला (तत्वतः) जाणत नाही. अपूर्व वस्स म्हणन आश्चर्याने आत्म्याबद्दल मोठमोठ्या लोकांनी किती जरी वाटाघाट केली ती त्याचे खरे स्वरूप कळणारे लोक फारच थोडे असल्यामुळे मृत्यूबद्दल पुष्कळ लोकं शोक करीत असतात. पण तसे न करितां तूं पूर्ण विचाराने आत्मस्वरूप यथातथ्याने समजून घे व शोक सोड असा याचा अर्थ आहे. कठोपनिषदांत (कठ. २७) याच मासल्याचे अभ्याचे वर्णन आहे. ] (३०) सर्षीच्या शरीरांत ( असणारा) शरीराचा मालक (आत्मा) हा सर्वदा अवध्य म्ह. कधीहि वध न पावणारा आहे; म्हणून हे भारता (अर्जुना)! सर्व म्ह० कोणत्याहि भूनाबद्दल सांक करणे तुला योग्य नाही. व्य किया संन्यासमागील तत्वज्ञानाप्रमाणे आरमाहा अमर म्हणून व देह हा स्वभावतःच अनित्य असल्यामुळे कोणी मरो वा मारो त्यांत 'शोक' करण्याचे कारण नाही असे आतापर्यंत सिद्ध केले. परंतु

एचट्यावरून कोणी कोणाला मारिलें तर त्यांत 'पाप' नाही असे जर

कोणी अनुमान करील तर ती भयंकर चूक होय. मरणे किंवा मारण या दोन शब्दांच्या अर्थाचे पृथक्करण असून, मरण्याची किंवा मार-

ण्याची जी भीति वाटते ती प्रथम दूर करण्यापुरतेच हे ज्ञान सांगितले

आहे. मनुष्य म्हणजे आत्मा व देह यांचा समुञ्चय होय. पैकी आत्मा अमर असल्यामुळे मरणे किंवा मारण हे दोन्ही शब्द त्यास लागत नाहीत, बाकी राहिला देह, पण तोहि स्वभावतःच अनित्य असल्यामुळे