पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. तस्मादेवं विदित्यैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥ $$ अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥ जातस्य हि ध्रुवो मृत्युर्धवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽथै न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥ [हे वर्णन उपनिषदांवरून घेतलेले असून ते निर्गुण आत्म्याचे आहे, सगुणाचे नव्हे. कारण अधिकार्य किंवा चित्य ही विशेषणे सगुणास लागू शकत नाहीत. त्याच्या आधारे शोक न करण्याबद्दल ही उपपत्ति सांगितली. आतां कदाचित् कोणी असा पूर्व पक्ष करील की, आम्ही आत्मा निस्य समजत नसल्यामुळे तुमची उपपत्ति आम्हांस ग्राह्य नाहीं. " म्हणून या पूर्वपक्षाचा प्रथम उल्लेख करून त्याचे भगवान् असे उत्तर देतात की-] (२६) अथवा हा आत्मा (नित्य नसून शरीराबरोबरच ) नेहमी जन्मतो किंवा नेहमी मरते असे तूं मानीत असलास तरीहे हे महाबाहो त्याचा शोक करणं तुला उचित नाही. (२७) कारण जो जन्मला त्याला मृत्यु निश्चित आहे, आणि जो मेला त्याला जन्म निश्चित आहे; म्हणून (या) अपरिहार्य (तुझ्या वरील मताप्रमाणेहि) शोक करणे तुला उचित नाही. वरील दोन श्लोकांत सांगितलेली उपपत्ति सिद्धान्तपक्षाची नाही, अथ च= अथवा ' या शब्द में मध्येच उपस्थित केलेल्या पूर्वपक्षाला हे उत्तर आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. आत्मा नित्य माना की अनित्य माना उभयपक्षीहि शोक करण्याचे कारण नाही, एवढेच दाखवावयाचे आहे. गीतेचा खरा सिद्धान्त आत्मा सत , निस्य, अज, अधिकार्य अणि अचिंत्य किंवा निर्गुण आहे असे प्रथमच सांगितले आहे. असो; देह अनित्य म्हणून शोक करणे युक्त नाही यार्चाच दुसरी म्हणजे सांख्य. शास्त्राप्रमाणे उपपत्ति सांगतात- - - - - - - - -