पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. २९ चासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ॥ तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२॥ नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यायो न शोषयति मारुतः ॥ २३ ॥ अञ्छद्योऽयमदाह्योऽयमक्केद्योऽशोप्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥२४॥ अव्यक्तोऽयमचित्योऽयमविकार्योऽयमुच्यते । मारणार (तरी) कसा? (२२) ज्या प्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी ग्रहण करितो, त्याप्रमाणे देही म्ह. शरीराचा मालक आस्मा जुनी शरीरे टाकून दुसन्या नव्या शरीरांशी संगम पावतो. [ वस्त्राची ही उपमा प्रचारांतली आहे. महाभारतात दुसन्या ठिकाणी एक घर (शाला) सोडून दुसन्या घरात जाण्याचा दृष्टांत घेतला आहे (शां. १५.५६); व एका अमेरिकन ग्रंधकाराने हीच कल्पना पुस्त- काला नवा पुठा घालण्याचा दृष्टान्त देऊन व्यक्त केली आहे. मागे तेराव्या श्लोकांत बालपण, तारुण्य व वाधक्य या अवस्थांस जो न्याय लागू केला आहे तोच आतां शरीराला लाविला आहे.] (२३) याला म्हणजे आत्म्याला शस्त्र तोदीत नाहीत, याला.अ. जाळीत नाही, तसेच याला पाणी भिजवीत नाही, य वायु सुरुवीतहि नाही. (२४) (कधीहि) न तुटणारा, न जळणारा, न भिजणारा व न सुकणारा हा (आत्मा) नित्य, सवत्र भरलेला, स्थिर, अचल व सनातन म्ह. चिर. तन आहे. (२५) या आत्म्यालाच अव्यक्त म्हणजे इंद्रियांना गोचर न होणारा, अचिंत्य म्हणजे मनानेहि जाणण्यास अशक्य आणि अविकार्य म्ह० ज्याला कोणत्याच विकाराची उपाधि नाही, असे म्हणतात. यासाठी हा (आत्मा) अशा प्रकारचा आहे हे जाणून त्याचा शोक करणे तुला योग्य नाही.