पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता. भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३५७ नञ्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यदुत हरेः। विस्मयो मे महान राजन् हृष्यामि च पुनः पुनः ॥७॥ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थी धनुर्धरः । तत्र श्रीविजयो भृतिर्धवा नीतिमतिर्मम ।। ७८ ।। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिपासु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८॥ अन्दुत व पुग्यकारक संवादाची आठवग होऊन होऊन मला पुनःपुन: हर्प होत आहे; (७७) आणि श्रीहरीचे ते अत्यद्भुत विश्वरूप मनांत येऊन देऊन हे राजा! मला मोगा विस्मय वाटतो व पुनः हर्प होतो! (७८) जिद योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुधर अर्जुन तिकडेच श्री. विजय, शाश्वत पेय व नीति, असे माझे मत आहे. [सारांश, ज्या ठिकाणी युक्ति व शक्ति एकत्र झालो तेथें ऋद्रिसिद्धि निश्चित वास करितात, नुसत्या शक्तीने अगर युक्ती ने नेहमी काम भागत नाही हा सिद्धान्त होय. जरासंधवधार्थ मसलत चालली असतां युधिष्ठिराने श्रीकृष्णास "अन्वं बलं जडं प्राहुः प्रणेतव्यं विचक्षणैः" (सभा. २०.१६)-वळ आंबळे व जड आहे त्याला शहाण्यांनी मार्ग दाखविला पाहिजे असे सांगितले आहे; व श्रीकृष्णानीहि " माय नीतिर्बलं भीमे" (सभा.२०.३) माझे ठायी नीति व भीमाचे अंगांत बल असं म्हणून भीमसेनाला बरोबर घेऊन त्याच्याकडून जरा- संधाचा वध युक्तोने करविला आहे केवळ नीति सांगणारा अबों शहाणा समजावयाचा. अर्थात् योगेश्वर म्हणजे योग अथवा युक्ति यांचा ईश्वर आणि धनुर्धर म्हणजे योद्धा, असे अर्थ असून ही दोन्ही विशेषणे या श्लोकांत सहेतुक योजिलेली आहेत.]