पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५६ श्रीमद्भगवद्गीता. राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृप्यामि च मुहुर्मुहुः ।। ७६ ॥

[व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टि दिली होती म्हणून रणभूमीवर जे

काय घडे ते बसल्या ठिकाणीच त्याला प्रत्यक्ष दिसे, व त्याप्रमाणे तो धृतराष्ट्राला कळवी, हे आरंभीच सांगितले आहे. श्रीकृष्णांनी जो 'योग' सांगितला तो कर्मयोग असून (गी. ४.१-३) अर्जुनाने पूर्वी त्याला 'योग' (साम्ययोग) असे म्हटले आहे (गी. ६.३३); आणि आतां संजयहि श्रीकृष्णार्जनांच्या संवादास 'योग' हेच नांव या श्लोकांत देत आहे. यावरून श्रीकृष्ण, अर्जुन व संजय या तिघांच्याहि मते 'योग' म्हणजे कर्मयोग हाच गीते तील प्रतिपाद्य विषय आहे हे उघड होते आणि अध्यायसमाप्तिसूचक संकल्पांतहि तोच म्हणजे 'योगशास्त्र' हा शब्द आलेला आहे. परंतु योगेश्वर या पदांत 'योग' शब्दाचा अर्थ याहन व्यापक आहे. योग म्हणजे एखादें कर्म करण्याची युक्ति, कौशल, शैली असा सामान्य अर्थ आहे. याच अर्थी बहुरूपी आपली सोंगे योगाने म्ह• कौशलाने आणितो असे म्हणतात. पण कर्म करण्याच्या ज्या या युक्त या त्यांत श्रेष्ठ कोणती हे पाहूं गेलें तर परमेश्वर मूळांत अव्यक्त असतां तो ज्या युक्तीने स्वतः लाच व्यक्त स्वरूप देतो, ती युक्ति किंवा योग सर्वात श्रेष्ठ होय असे महणावे लागते. गीतेत यालाच 'ईश्वरी योग' (गी. ५, ११.८) असें म्हटले आहे; व वेदान्तांत ज्याला माया म्हणतात ती हीच होय (गी. ७.२५). हा अलौकिक किंवा अघटित योग ज्याला साधला स्याला बाकीच्या युक्तथा म्हणजे हाताचा मळ होय. परमेश्वर या योगांचा किंवा मायेचा अधिपति आहे, म्हणून त्यास योगेश्वर म्हणजे योगांचा स्वामी हे नाव पडले भाहे. योग म्हणजे पातंजल योग हा अर्थ योगेश्वर' शब्दांत विवक्षित नाही. (७६) है राजा (पृतराष्ट्रा!) केशव व अर्जुन या दोघांच्या या