पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग म्हणजे कर्मयोगशास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील मोक्षसंन्यासयोग नांवाचा अठरावा अध्याय समाप्त झाला. | मोक्षसंन्यासयोग या शब्दांत 'संन्यास' शब्दाचा अर्थ या अध्या- याच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे काम्य कर्माचा संन्यास' असा आहे. चतुर्थाश्रमरूपी संन्यास हा अर्थ विवक्षित नाही, हे लक्षात ठेविलें पाहिजे. स्वकर्म न सोडितां त्याचा परमेश्वराच्या ठायीं मनाने संन्यास म्हणजे अर्पण केल्याने मोक्ष मिळतो, असें या अध्यायांत प्रतिपादन असल्यामुळे, याला मोक्षसंन्यासयोग हे नांव दिले आहे. ] येणेप्रमाणे बाळ गंगाधर टिळककृत श्रीमद्भगवद्गीतेचे रहस्यसंजीवन नांवाचे प्राकृत भाषान्तर व टीका समाप्त झाली. महाराष्ट्री बाळ हिज-कुलज गंगाधर-सुत। बसे पुण्यक्षेत्री टिळक उपनामें श्रुतिस्त ।। रहस्या गीतेच्या प्रकटवुनि अष्टादशशतीं। समी श्रीशाते सदसि-युती तो शकमिती ।। ॥ ॐ तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु । ॥ शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ॥